क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रमावळसामाजिक

१००व्या नाट्य संमेलनाची तळेगाव दाभाडे येथे सांगता.

चला हवा येऊ द्या’ या जगप्रसिद्ध कार्यक्रमाचे सादरीकरण येत्या २४ जानेवारी बुधवारी, सायंकाळी ६ वाजता.

Spread the love

१००व्या नाट्य संमेलनाची तळेगाव दाभाडे येथे सांगता ; चला हवा येऊ द्या’ या जगप्रसिद्ध कार्यक्रमाचे सादरीकरण येत्या २४ जानेवारी बुधवारी, सायंकाळी ६ वाजता.100th Drama Conference held at Talegaon Dabhade; The presentation of the world famous program ‘Chala Hawa Yeu Dya’ will be held on Wednesday, January 24, at 6 PM.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २३ जानेवारी.

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शतक महोत्सव शंभरावे नाट्य संमेलन पुणे पिंपरी चिंचवड येथे नुकतेच संपन्न झाले. या संमेलनाचा पुणे जिल्हास्तरीय सांगता समारंभ तळेगाव दाभाडे येथे होत आहे. या संमेलनाचा भाग असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या जगप्रसिद्ध कार्यक्रमाचे सादरीकरण येत्या २४ जानेवारी बुधवारी, सायंकाळी ६ वाजता या मालिकेतील प्रमुख कलाकार करणार आहेत.

प्रारंभी नाट्यदिंडी दुपारी ३.३० वाजता स्थानिक कलाकारांचे कलाविष्कार, लोककलांचे सादरीकरण, आदी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतरच्या मुख्य कार्यक्रमात नाट्य परिषद नाट्य चळवळीतील वरिष्ठ कलाकारांचे सन्मान होणार आहेत. १०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ‘प्रशांत दामले’ व प्रसिद्ध कलाकारही असलेले परिषदेचे मान्यवर पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

या सांगता समारंभाचे प्रायोजक असणारे आमदार श्री सुनील शेळके, पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर व तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगता सोहळ्याचे नियोजन चालू आहे; तरी रसिक व कलाकारांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून हा ऐतिहासिक असा शंभरावा नाट्यसंमेलनाचा समारंभ यशस्वी करावा असे विनंती पूर्वक आवाहन अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय व तळेगाव शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.

(अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मावळ)
सदस्य (१००वे नाट्य संमेलन आयोजन समिती)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!