क्रीडा व मनोरंजनमावळ

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भव्य सोहळ्यात राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Spread the love

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भव्य सोहळ्यात राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.Krishnarao Bhegade English Medium School organized various programs in honor of Ram Lalla’s death in a grand ceremony.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २३ जानेवारी.

तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त भव्य कार्यक्रम सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे संस्थापक. चंद्रकांत काकडे अध्यक्ष. संदीप काकडे खजिनदार. गौरी काकडे यांच्या हस्ते श्रीराम लल्लांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्रीराम , लक्ष्मण व सीतामाता यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे , शाळेच्या मुख्याध्यापिका. मीना अय्यर यांनी हळदी कुंकुम लावून, निरंजनाने ओवाळून स्वागत करण्यात आले.

त्यांच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या तसेच दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. दिव्यांच्या रोषणाईने सर्व परिसर प्रकाशित शांततामय व पवित्र झाला होता. या कार्यक्रम प्रसंगी भगवान रामांच्या जीवन आणि शिकवणीभोवती केंद्रित एका नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकात सीता हरण व रावण वध या प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ. शिवा मिश्रा यांनी तुलसीदास रचित रामसूक्तम् आपल्या सुमधुर आवाजात गायले.

शाळेच्या शिक्षिका श्रावणी देसाई,  मोहिनी खोले, कीर्ती कुलकर्णी,  वैजयंती पोतदार यांनी रामरक्षा स्तोत्र म्हटले. शाळेच्या परिसरात सर्वत्र ‘जय सियाराम की जय, जय श्रीराम ‘ असा घोष विद्यार्थी करत होते. सौ पल्लवी चव्हाण त्यांनी श्रीरामांचे महत्त्व आणि अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक संदर्भावर अभ्यासपूर्ण भाषण केले. या कार्यक्रम प्रसंगी पालकही बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये भगवा झेंडा फडकत होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी सुतार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!