अध्यात्मिकमावळसामाजिक

प्रभू श्री राम अयोध्या प्राण प्रतिष्ठा या सोहळ्या निमित्ताने, हनुमान मंदिर चे जीर्णोद्धार नूतन वास्तूचा कार्यक्रम संपन्न.

Spread the love

प्रभू श्री राम अयोध्या प्राण प्रतिष्ठा या सोहळ्या निमित्ताने, हनुमान मंदिर चे जीर्णोद्धार नूतन वास्तूचा कार्यक्रम संपन्न.On the occasion of Prabhu Shri Ram Ayodhya Pran Pratishtha, the program of renovation of Hanuman temple was completed.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २३ जानेवारी.

प्रभू श्री राम अयोध्या प्राण प्रतिष्ठा या सोहळ्या निमित्ताने काल गंगा रेसिडेन्सी येथे समस्थ भोसले परिवार व गंगा रेसिडेन्सी रहिवाशी यांच्या तर्फे हनुमान मंदिर चे जीर्णोद्धार नूतन वास्तूचा कार्यक्रम घेण्यात आला.

या मंदिरचे जीर्णोद्धारसाठी विशेष सहकार्य  गोरखभाऊ काळोखे, बाबाशेठ काळोखे व सिद्धार्थ काळोखे यांचे अनमोल सहकार्य लाभले, मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी भोसले परिवार तर्फे  बाळासाहेब भोसले, उत्तम भोसले, नारायण भोसले, नंदकुमार कोतुळकर,  रवी भोसले,  नितीन भोसले, मनोज भोसले, अमरीश भोसले,  सदाशिव भोसले, प्रणव भोसले, विक्रम भोसले यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

सायंकाळी तुळजाई भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास महिला भगिनी मोठ्या प्रमाणात हजर होत्या. कार्यक्रम पार पडल्यानंतर नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!