अध्यात्मिकलोणावळा

श्रीराम मंदिर प्रतिकृती व श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या चिञरथाची लोणावळ्यात मिरवणूक.

शोभायाञेत हजारो महिला व पुरूषांची पारंपरिक पोशाखात हजेरी.

Spread the love

श्रीराम मंदिर प्रतिकृती व श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या चिञरथाची लोणावळ्यात मिरवणूक ; शोभायाञेत हजारो महिला व पुरूषांची पारंपरिक पोशाखात हजेरी.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २जानेवारी.

श्रीराम मंदिर प्रतिकृती व श्रीराम , लक्ष्मण , सीता आणि हनुमान यांचे चिञरथाची लोणावळ्यामधे शोभायाञेत भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत सुमारे दहा हजाराचेवर महिला आणि पुरूषांनी हजेरी लावली होती.भांगरवाडी येथील श्रीराम मंदिरापासून ते गवळीवाडा येथील श्रीराम मंदिरापर्यत ढोलताशांच्या दणदणाटात, बँजो, बँडचे व डीजेच्या तालामधे ही मिरवणूक निघाली.

सात अश्वांच्या रथामधून श्रीराम, लक्ष्मण, सीता, आणि हनुमान यांचा चिञरथ मिरवणुकीत आकर्षण ठरला. सर्वात पुढे श्रीरामाचे अयोध्येमधे उभी राहिलेली मंदिराची प्रतिकृती आणि सुमारे दहा फूट उंचीची श्रीरामचंद्र भगवान यांची हाती धनुष्य बाणधारी प्रतिमा सर्वात पुढे शोभायाञेत मुख्य आकर्षण देत होते.

छञपती शिवाजी महाराज चौकात मिठाई बनवणारे गुप्ता व परदेशी बंधूंचे वतीने अकरा हजार मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले.तसेच येथे श्रीशिवछञपती व्यापारी असोसिएशनचे वतीने पाणी बाटल्या वाटप करण्यात आल्या.
मगनलाल चिक्की चे मुख्यशाखेतर्फे शोभायाञेत आलेल्या महिला, पुरूषांना बर्फी वाटप करण्यात आली.साधना माॕल व्यापारी दुकानदारांनी वडापावचे वाटप केले ; तर नवरत्न चिक्की चे वतीने चिक्की वडी व नॕशनल चिक्की चे वतीने मिठाई व थंडपेय वाटप करण्यात आले.

गवळीवाडा येथे श्रीराम मंदिरात महाआरती झाल्यानंतर श्रीराम महादेव मारूती दत्त देवस्थानचे वतीने मोतीचूर लाडूची पाकीटे वाटप करण्यात आली.
यावेळी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली. तसेच रंगीबेरंगी कागदाची आतषबाजी, करण्यात आली.
नवा बाजार, जुनाबाजारपेठेत, भांगरवाडीमधे, गवळीवाडा, येथे भगव्या पताका लावून बँनर लावून श्रीराम मुर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे आमंत्रण देणारी अवाहने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!