आंदोलनमहाराष्ट्रमावळलोणावळा

आरक्षण मागणीसाठी आलोय  ते घेण्यासाठी मुंबईला धडकणार..

शिष्टमंडळाला म्हटले, आमच्या माणसांशी बोलतो; मग तुमच्याशी बोलतो : मनोज जरांगे पाटील.

Spread the love
आरक्षण मागणीसाठी आलोय  ते घेण्यासाठी मुंबईला धडकणार ;  शिष्टमंडळाला म्हटले, आमच्या माणसांशी बोलतो; मग तुमच्याशी बोलतो : मनोज जरांगे पाटील.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २५ जानेवारी

आरक्षण मागणीसाठी आलोय, ते घेण्यासाठी मुंबईला धडकणार आहे, शिष्टमंडळाला म्हटले, आमच्या माणसांशी बोलतो ; मग तुमच्याशी बोलतो !माझी मराठा समाजाला विनंती आहे, मराठा समाज दिलेला शब्द पाळतो, मी ही तुम्हाला विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही. मनोजभाऊ जरांगे पाटील यांनी वाकसईचाळ येथील सुमारे पंधरा ते वीस मिनिटांचे तडाखेबाज भाषणात मराठा समाजाला मार्गदर्शन करताना आपले ठाम विचार मांडले.

वाकसईचाळ येथील आडीचशे एकर मैदानावर ता.२४ रोजी साडेआठला सभा होणार होती, पण पुण्यातून लोणावळ्याकडे यायला मराठा क्रांतीयोध्दा मनोज जरांगे पाटील यांना आज सकाळी सात वाजले. आज ता २५ रोजी झालेल्या विराट सकल मराठा समाजाचे सभेत पुढे बोलताना ” मराठा क्रांतीयोध्दा मनोज जरांगे पाटील म्हणाले, या मुंबई कडे जाणाऱ्या पायी वारीला, मोर्चामधे कोणत्याही मराठी पोराने काही गडबड होऊ दिली नाही, आणि केली नाही. आणि मुंबईत सुध्दा आम्ही शांततेत बसणार, कुठलीही गडबड करणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार ही नाही ! मी समाजाला शब्द दिलाय, तो मोडणार नाही ! समाजही पाठीशी आहे , मराठे कधी हटणार नाहीत.

जरांगे पाटील पुढे म्हणाले ” त्यांनी कुठेही, आंतरवाली, पुणे, लोणावळा किँवा पनवेल, मुंबईला आरक्षण द्यावे, त्यांच्याशी चर्चा करतोय. तुम्ही जेवण करून मुंबईच्या दिशेला तोंड करून गाड्या लावा.मी शिष्टमंडळातील लोकांशी बोलून तुमच्याकडे येतो !  असे म्हणाले.
ते पुढे म्हणाले , ” आजपासून लोक वाढायला लागलेत. ता.२६ जानेवारीला आपण मुंबईत असणार आहोत, आपण सर्वानी यापुढे आणखी एक जबाबदारी पाळणार आहोत. सर्वांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे.”
सरकारला माझे सांगणे आहे, आम्ही मुंबईत येणार आहे. महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची आणि जनतासुध्दा आमची आहे ! तिथल्या लोकांना ञास होणार नाही, अशी खबरदारी आपण घेतली पाहिजे. जाताना आणि तिथे आपल्याला व दुसऱ्याला इजा होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. कुणाची गाडी, टेम्पो खराब झाली, तर चार पाच लोकांनी ती दुरूस्त करून घेवून त्यांना बरोबर घ्यायचे आहे, मधेच सोडायचे नाही. कुणी जखमी झाले, लगेच अँम्बुलन्सला बोलावून त्यास उपचारासाठी रूग्णालयात दाखल करा.

कुणी ञास दिला, तर त्याला मारू नका, त्याला पोलिसांकडे द्या, तो आपला असू द्या, नाहीतर बाहेरचा ! पण माझ्याशी बोलून निर्णय घ्या.कुणी आपल्या गाडी व्यतिरिक्त बाहेर लक्ष देवू नका. आपली सभेची, पार्कींग चे जागेत आपण थांबा. कुठे बाहेर लक्ष देवू नका.शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही.
महाराज मंडळी एकच कीर्तन करीत होते, आता मुंबई बद्दल बोलत आहेत. महाराज, किर्तनकार मंडळी आपल्याला आरक्षण मिळू द्या, तुंम्हाला ञास देणाऱ्यांचा सर्व हिशोब होणार आहे. कुणाला भाकरी नसेल, तर आपल्या ताटातील आर्धी द्या. कुणाला पाणी नसेल, तर आपल्या बाटलीतील अर्धे पाणी त्याला द्या.

मावळातील सकल मराठा समाजाचेवतीने सकाळी नऊ नंतर आकरा वाजता सभा होणार असल्याचे जाहीर केले.
राञभर जागलेले मराठा समाजाचे लाखो कार्यकर्ते आज अकरापर्यत या अडीचशे एकर जागेच्या मैदानावर सभा स्थानी आले होते. लोकांनी मावळातील गावागावामधून सकल मराठा बांधवांसाठी घरटी भाकरी व मिरचीचा ठेचा, शेंगदाणे, खोबरे याची मिरची, काहींनी पुलाव भात, काही स्टाॕलवर बुंदी असे खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले.अनेकांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या.परिसरामध्ये विजेची, पाण्याची, स्वच्छतागृह, स्नानासाठी पाणी याची सोय व राहण्यासाठी तीन, ते पाच मैदाने आखून दिल्याने कुणाची गैरसोय झाली नाही.

छञपती शिवाजी महाराज की जय ! धर्मवीर संभाजी महाराज की जय चा, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे ! नाही कुणाचे बापाचे ! ! अशा घोषणा देत, छञपतीँच्या कार्याचा पोवाडा आदी ध्वनीवर्धकावर गीत लावून जरांगे पाटील यांचे व्यासपीठावर आगमन झाले. पाच सुवासिनींनी ओवाळले. त्यांचेकडून शिव छञपतीँच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांचा मावळ तालुका सकल मराठा समाजातर्फे क्रेनने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोजभाऊ जरांगे पाटील यांचे वाकसईचाळ येथील आडीचशे एकर मैदानावर सभा होणार असल्याने सकाळी नऊपासूनच आकरा वाजेपर्यंत येथे सभा होणार आसल्याने लाखोंची संख्या या ठिकाणी जमली होती. मनोजभाऊ जरांगे पाटील यांचे सभेकडे सर्वाँचे लक्ष लागले होते.

पुण्यातील मुक्काम आटोपून मराठा समाजाचे स्वागत स्विकारत मराठा क्रांतीसूर्य मनोजभाऊ जरांगे पाटील पुणे शहरात लाखोंची संख्येने थांबलेल्या मराठा बांधवांचे बरोबर बोलून त्यांचे स्वागत स्विकारत ते तळेगाव, वडगाव, कामशेत, कार्लाफाटा मार्गे जरांगेचे भाषणास सर्व मराठा समाज येथे लाखौँच्या संख्येने एकवटला आहे.

या सभेत मनोजभाऊ जरांगे पाटील म्हणाले,” येथे एक राज्यसरकारचे शिष्टमंडळातील लोक आले आहेत, पण मी तुमचा सर्वांचा विचार घेतो, मगच भेटेल असे त्यांना बोललो व सभेला आलो. ते काय बोलतात, याकडे सर्वांचे सरकारसह सर्व समाज बांधवांचे लक्ष लागले आहे.
माझी तब्येत बिघडली. मला घरादाराची पर्वा नाही, फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे, नोंदी सापडल्या त्या सर्व लोकांना बावन्न लाख दाखले मिळावेत.

सुमारे पंधरा ते वीस लाख लोक सभेला उपस्थित होते. सकाळी नऊपासून राञी साडेआठ नऊपर्यत मुंबई पुणे महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी रांगेमधे वाहनांच्या रांगा लावल्या होत्या. लोणावळा ग्रामिणचे पोलिसांकडून पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांचे सहकारी यांनी उपविभागीय पोलिसआधिकारी आयपीएस आधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!