आरोग्य व शिक्षण

कौठळी शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया.

Spread the love

कौठळी शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया.Students of Kauthali School experienced the election program 

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, २५ जानेवारी.

दिनांक २५ जानेवारी –कौठळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान जनजागृती व्हावी या उद्देशाने मतदार दिन साजरा करण्यात आला.प्रभातफेरी काढण्यात आली.त्यामध्ये विविध घोषवाक्यांचे बॅनर होते. सर्व शिक्षक, विद्यार्थी व उपस्थित पालकांना मतदार प्रतिज्ञा देण्यात आली. विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेची माहिती व्हावी म्हणून शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थ्यांना मतदानासाठी आवश्यक सूचना, उमेदवार, चिन्ह, प्रचार, ओळखपत्र, बोटाला शाई लावणे, प्रत्यक्ष मतदान अनुभव व मतमोजणी प्रक्रिया स्व अनुभवाने समजली.

आरती गायकवाड व अमित भोंग यांनी मतदार दिनाविषयीची माहिती दिली. यावेळी उमेदवार, मतदार व मुख्याध्यापक भारत ननवरे उपस्थित होते. या उपक्रमाचे कौतुक पंचायत समिती इंदापूर चे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, विस्तार अधिकारी सुनिल मुगळे, केंद्रप्रमुख संभाजी आजबे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य,पालक यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!