मावळसामाजिक

इनाली फाउंडेशन तळेगाव दाभाडे मार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप कॅलिपर फिटमेंट शिबिर.

Spread the love

इनाली फाउंडेशन तळेगाव दाभाडे मार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप कॅलिपर फिटमेंट शिबिर.Caliper fitment camp distributing materials to disabled students through Inali Foundation Talegaon Dabhade.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २५ जानेवारी.

पंचायत समिती मावळ समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण विभाग, इनाली फाउंडेशन तळेगाव दाभाडे व मायमर वैद्यकीय महाविद्यालय, डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे यांच्या मार्फत दिनांक 23 जानेवारी २०२४ रोजी साहित्य वाटप कॅलिपर फिटमेंट शिबिर घेण्यात आले.

साहित्य साधने संदर्भित दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वैद्यकीय तपासणी शिबिरातील अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग प्रवर्गातील संदर्भित 10 दिव्यांग विद्यार्थ्यांना कॅलिपर, AFO कॅलिपर या साहित्याचे वाटप करण्यात आले.मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी. सुदाम वाळुंज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. शिबिरास विद्यार्थी पालक, शिक्षक उपस्थित होते.

सदर शिबिरास मायमर वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी उपस्थित होते तसेच इनाली फाउंडेशनचे सतीश सर, रवींद्र सर व सर्व स्टाफ यांचे विशेष सहकार्य मिळाले. शिबिरास समावेशित शिक्षण विभागाच्या विशेष साधन व्यक्ती  शितल शिशुपाल मॅडम, विशेष शिक्षक स्मिता जगताप मॅडम, साधना काळे, सुमित्रा कचरे , लता वनवे  यांनी उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!