आरोग्य व शिक्षणदेश विदेशमावळ

मावळची सुकन्या कु.आर्या बोञे हिची उच्चशिक्षणामधे सातासमुद्रापार गगन भरारी.

पदवीधर समारंभ इंग्लंड येथील मँचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये अत्यंत थाटामाटा मध्ये संपन्न.

Spread the love

मावळची सुकन्या कु.आर्या बोञे हिची उच्चशिक्षणामधे सातासमुद्रापार गगन भरारी ..Maval’s Sukanya Arya Bone has soared across seven seas in her higher education. पदवीधर समारंभ इंग्लंड येथील मँचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये अत्यंत थाटामाटा मध्ये संपन्न

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १३ डिसेंबर.

मावळ तालुक्यातील वेहेरगाव या छोट्याशा गावात राहणाऱ्या कु.आर्या जितेंद्र बोत्रे या विद्यार्थीनीने उच्चशिक्षणामधे साता समुद्राच्या पार  परदेशातील विद्यापीठामधे यशस्वी होत उत्तुंग भरारी घेतली आहे.युके इंग्लंड मध्ये मँचेस्टर या नामांकित युनिव्हर्सिटी मधून मास्टर्स ॲाफ सायन्स बायोटेक्नॉलॉजी ॲन्ड इंटरपायजेस या डिग्रीचे शिक्षण मेरिट लिस्ट मध्ये येऊन पूर्ण केले.वडील भाजपचे प्रदेश चिटणीस.जितेंद्र बोञे आणि आई सायलीताई जितेंद्र बोञे या भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी केलेल्या संस्कारामुळे आज आर्याने परदेशातही नावलौकिक मिळवला आहे.

तिचा पदवीधर समारंभ इंग्लंड येथील मँचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये अत्यंत थाटामाटा मध्ये संपन्न झाला. तिने शालेय शिक्षण लोणावळा येथील रायगड इंटरनॅशनल या शाळेमधून पूर्ण केले शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व इतर कार्यक्रमांमध्ये ती सहभागी होत असत शाळेच्या जडणघडणीमध्ये ती अग्रभागी असत.शाळेमध्ये ती विद्यार्थ्यांमधून मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून शालेय कॅप्टन म्हणून तिची निवड करण्यात आली होती, विद्यार्थ्यांकरिता तिने खूप चांगले कार्य केले, शालेय गॅदरिंग मध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावरती एक नाट्य प्रयोग करण्यात आला होता.त्यावेळी तिने जिजाऊची भूमिका खूप सुंदर पद्धतीने साकार केल्यानंतर लोणावळ्याकरांनी तिचे कौतुक केले.

पुढील शिक्षण तिने त्यानंतर पुणे येथील वाडिया कॉलेजमध्ये अत्यंत चांगल्या गुणांनी पूर्ण केल्यानंतर युके येथील अनेक युनिव्हर्सिटी च्या मध्ये तिने प्रवेशासाठी एप्लीकेशन केले होते. अभिमानाची गोष्ट म्हणजे तिने सात कॉलेजची निवड केली होती सातही कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला होता नामांकित मँचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेण्याचं तिन्ही निर्णय केला.

तिने दिवसराञ अभ्यासामध्ये स्वतःला झोकुन घेऊन खूप मेहनत करून तिने ही डिग्री मेरीट लिस्ट मधुन संपादन केल्याचे आई-वडिल नातेवाईक व आपल्या मावळ तालुक्यातील सर्व लोकांमध्ये अभिमान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मेरिट लिस्ट मध्ये आल्याने इंग्लंड मध्ये अनेक नोकरीच्या संधी आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!