अध्यात्मिकक्रीडा व मनोरंजनसामाजिक

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने कार्तिकी वारीनिमित्त वारकरी दिंड्यांचे स्वागत, सन्मान व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न..

कान्हे फाटा ते वडगाव दरम्यान संतकृपा व्यापारी संकुलामधे जांभुळ फाटा, मावळ येथे करण्यात आले.

Spread the love

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने कार्तिकी वारीनिमित्त वारकरी दिंड्यांचे स्वागत, सन्मान व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी १२ डिसेंबर.

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने कार्तिकी वारीनिमित्त वारकरी दिंड्यांचे स्वागत, सन्मान व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहु ! या अभंगाप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या कार्तिकी याञा व संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कोकण व रायगड, मावळातून आलेल्या वारकऱ्यांचे दिंड्यांचे उत्साहात स्वागत ता.५,६,व ७ या दिवशी कान्हे फाटा ते वडगाव दरम्यान संतकृपा व्यापारी संकुलामधे जांभुळ फाटा, मावळ येथे करण्यात आले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, आळंदी कार्तिकी पायी वारी निमित्त कोकण विभाग व मावळ तालुक्यामधून आळंदीला पायी जाणाऱ्या दिंड्यांतील वारकऱ्यांना मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चहा, अल्पोपहाराची व्यवस्था व शाल श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अतिशय उत्साहात आयोजन केले गेले. या कार्यक्रमासाठी जांभूळ गावचे  सरपंच. संतोषभाऊ जांभूळकर हे अनेक वर्षांपासून मोफत जागा उपलब्ध करून देत आहेत.

श्री पांडुरंगाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून तीनही दिवशी सकाळी ६ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राजस्थान वारकरी सांप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष व मंडळाचे मार्गदर्शक ह.भ.प. श्रीमंत रमेशसिंहजी व्यास यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देवून मंडळाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व वारकरी सेवेत आपला सहभाग दिला. यावेळी तालुक्यामधील अनेक प्रमुख मान्यवरांनी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देवून मंडळाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. तसेच दिंड्यांतील अनेक वारकरी बंधू- भगिनींनी मंडळाच्या या कार्याप्रती समाधान व्यक्त केले.
दिनांक 6 डिसेंबर रोजी मंडळाने छापलेल्या 5000 दिनदर्शिकांचे प्रकाशन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

मंडळामार्फत या दिनदर्शिकांचे संपूर्ण मावळ तालुक्यात मोफत वितरण केले जाणार आहे. तसेच यावेळी मंडळामध्ये विविध पदांवर काम करण्यासाठी अनेक नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देवून नियुक्त्या करण्यात आल्या. पवन मावळ विभागीय अध्यक्षपदी ह.भ.प. रोहिदास अर्जुन घारे यांची तर पवन मावळ विभाग प्रमुखपदी शिवाजीराव बोडके, भाऊसाहेब मापारी, दशरथ सावंत, सज्जन महाराज दांगट, नाणे मावळ विभाग प्रमुखपदी ह.भ.प. काशिनाथ सातकर, संपर्कप्रमुखपदी संतोष शेलार, लोणावळा शहराध्यक्ष पदी बाळासाहेब पाटारे, वडगाव शहराध्यक्षपदी दत्तात्रय महाराज टेमगिरे, उपाध्यक्षपदी विठ्ठलराव ढोरे, कामशेत शहराध्यक्षपदी शंकरराव खेंगले, उपाध्यक्षपदी कुंडलिक साठे, आंदर मावळ विभाग प्रमुखपदी दत्ताभाऊ तुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून ह.भ.प. स्वामी निरंजनानंद सरस्वती ( परमहंस महाराज), ह.भ.प. नितीनदादा घोटकुले, ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज ठाकर, मावळ पंचायत समितीच्या मा. सभापती निकीताताई घोटकुले, मा. सभापती सुवर्णाताई कुंभार, सरपंच संतोषजी जांभूळकर, मा. उपसभापती शांताराम कदम, माऊली उडाफे, मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, उपसरपंच एकनाथ शेटे, संचालक अरूणभाऊ शेटे, मंडळाचे मार्गदर्शक शिवाजीआण्णा पवार, मा. सरपंच सुरेशराव गायकवाड, मा. सरपंच शामराव गायकवाड, मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष कुंभार आदी उपस्थित होते. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे यांनी मंडळाच्या कार्याचा थोडक्यात आढावा दिला व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती शांताराम कदम यांनी मनोगतात मंडळांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या कार्याची प्रशंसा केली.स्वामी निरजानंद सरस्वती यांनी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळांचे वारकऱ्यांचेदिंड्यांना करत असलेल्या अन्नदान व स्वागत कार्यक्रमाबद्दल मंडळाचे व सर्व पदाधिकारी यांचे कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
वारकरी, संत, साधू यांचेप्रती सेवाभावाने कार्य केलेले कधीही वाया न जाता पुण्याचा मार्ग असून संस्थापक अध्यक्ष नंदकुमार शिवरामदादा भसे यांचे कुशल नेतृत्व या मंडळाला लाभले आहे.मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहे, असे ते म्हणाले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष ह.भ.प. दिलीप वावरे, सचिव रामदास पडवळ, कोषाध्यक्ष बजरंग घारे, कार्याध्यक्ष संतोष कुंभार, वारकरी सेवा समितीचे अध्यक्ष देवराम सातकर, प्रवक्ते सुनिल महाराज वरघडे, संघटक गोपिचंद महाराज कचरे, महादुबुवा नवघणे, भरतजी येवले, जेष्ठ किर्तनकार नाथा महाराज शेलार, सुभाष महाराज पडवळ, बळवंत येवले, कायदेशीर सल्लागार अॕड. सागर शेटे, सहसचिव नितीन आडिवळे सर, नाणे मावळ विभागीय अध्यक्ष शांताराम गायखे, आंदर मावळ विभागीय अध्यक्ष दिपक रावजी वारिंगे, पवन मावळ विभागीय अध्यक्ष राोहिदास घारे, मंडळाचे विभाग प्रमुख शिवाजीराव बोडके, निलेश शेेटे, संजय महाराज बांदल, बाळासाहेब राजिवडे, सुखदेव गवारी, दशरथ सावंत, पंढरीनाथ वायकर, सदाशिव पेटकर, दत्ताभाऊ ठाकर, राजाराम असवले, काशिनाथ सातकर, बंडू कदम, भाऊसाहेब मापारी, रवि ठाकर, सज्जन महाराज दांगट, भिवाजी गायखे, प्रकाश गाडे, राजाराम विकारी, रोहिदास खांडेभराड, गोविंदराव सावले, वारकरी सेवा समितीचे गुलाब बधाले, विजय अरूण शेटे, बळीरामदादा नवघणे, मारूती देवकर, संपर्कप्रमुख संतोष शेलार, सखाराम घनवट मा.पो.पाटील) , चंद्रकांत रामभाऊ सातकर, बाळासाहेब देशमुख, दशरथ काळे, क्रियाशील सदस्य ह.भ.प. बाळासाहेब वारिंगे, श्रीरंग वायकर, शंकरराव शेटे, निखिल काकडे, पांडुरंग मोरमारे, साईनाथ राऊत, नामदेव खांडभोर, नानासाहेब घोजगे, योगेश चोपडे, बालवारकरी समितीचे अध्यक्ष रोहिदास जगदाळे, शांताराम लोहर, विजय लालगुडे, मोहन कदम, दत्तात्रय चोपडे, पत्रकार मच्छिंद्र मांडेकर, दशरथ भोसले, पांडुरंग जाचक, मदन कचरे, आदींनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!