क्राईम न्युजमहाराष्ट्र

खोपोली पोलीसांनी 218 कोटी पेक्षा जास्त किमतीचे 174.5 किलो मेफेड्रॉन केले जप्त.

करीकुट्टीकरण यांने काही अमली पदार्थ परदेशात पाठवले असल्याची ही माहिती..

Spread the love

खोपोली पोलीसांनी 218 कोटी पेक्षा जास्त किमतीचे 174.5 किलो मेफेड्रॉन केले जप्त.Khopoli police seized 174.5 kg of mephedrone worth more than 218 crores.

आवाज न्यूज ; प्रतिनिधी श्रावणी कामत, खोपोली.१२ डिसेंबर.

खोपोली पोलिसांनी दिनांक 8.12.2023 रोजी 107 कोटी 30 लाख 37 हजार 377 रुपये किंमतीचे मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केले होते. त्याच प्रकरणी अधिक तपास सुरू असताना दिनांक 10.12.2023 रोजी अटक आरोपी अँथोनी पाऊलोस करीकुट्टीकरण याचेकडून खालापूर तालुक्यातील होनाड गावातल्या गोडाऊनमध्ये लपून ठेवलेल्या सात बॅरल मधील 174.5 किलो वजनाचा 218 कोटी 12 लाख 50 हजार रुपये किमतीच्या मेफेड्रॉन अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळताच ताबडतोब धाड टाकून तो माल जप्त केला. करीकुट्टीकरण यांने काही अमली पदार्थ परदेशात पाठवले असल्याचीही माहिती दिली आहे.

आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी या प्रकरणाची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्यासह खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने, अभिजीत व्हरांबळे, पोलीस हवालदार सागर शेवते, प्रसाद पाटील, प्रशांत पाटील, प्रदीप कुंभार, संतोष रुपनवर, लिंबाजी शेंडगे, सतीश बांगर, प्रवीण भालेराव, प्रदीप खरात इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

या प्रकरणात अधिक तपास सुरू असून अजूनही काही धागेदोरे मिळण्याची शक्यता प्रवीण पवार यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!