महाराष्ट्र

जेजुरीत तीन गुप्तलिंग अखेर महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी खुले

जेजुरी शिवलिंग वर्षातून एकदाच महाशिवरात्रीला उघडले जाते

Spread the love

पुणे : महाराष्ट्राच कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या गडावर म्हणजेच जेजुरी गडावर महाशिवरात्री साजरी करण्यात येत आहे. या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या मंदिरात असणारी तीन गुप्तलिंग वर्षातुन फक्त एकदाच दर्शनासाठी खुले केले जातात.महाशिवरात्रीनिमित्त आज सकाळपासून गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीये.

खंडोबाच्या मुख्य उत्सवापैकी महाशिवरात्रीला वेगळे महत्व आहे. त्रिलोकातील दर्शनाचा लाभ यावेळी घेता येतो. मंदिराच्या शिखरातील शिवलिंगाला स्वर्गलोक तर मुख्य मंदिरातील स्वयंभूलिंगाला भूलोक व गाभाऱ्यातील भुगर्भात असलेल्या शिवलिंगाला पाताळलोक समजले जाते.

शंकरांनी स्वतः सगळं विष पिऊन मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशात म्हणजेच त्या पौर्णिमा रात्री शंकराचे गुणगान गायले गेले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. या रात्री जो कोणी भगवान शंकराची आराधना करेल त्याच्यावर ते नेहमी कृपादृष्टी ठेवतात असा समज आहे म्हणूनच या दिवशी लोक शंकराची पूजा करतात.

जेजुरी गडावर मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस छोट्या दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर खाली एक माणूस उतरू शकेल इतके छोटे तळघर आहे. तेथे हे गुप्त शिवलिंग आहे ते वर्षातून फक्त एकदा महाशिवरात्रीला उघडले जाते. शिवपार्वतीने कैलासानंतर पृथ्वीतलावर वास्तव्य केलेले एकमेव ठिकाण म्हणजे जेजुरी (जयाद्री) पर्वत असे म्हटले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!