मावळ

रणजीत काकडे फाउंडेशन मार्फत महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा संपन्न !

Spread the love

तळेगाव दाभाडे :- आर. एम. के. सोशल फाउंडेशन आयोजित ८ मार्च जागतिक महिला दिन सन २०२४ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना भविष्यात अजून चांगल्या प्रकारे प्रगती करण्यास प्रेरणा मिळावी या उद्देशाने रणजीत काकडे सोशल फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी निरनिराळ्या कार्यक्रमाचे अर्ज केले जाते त्यातीलच हा एक कार्यक्रम महिला दिनाचा आहे.

रणजीत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन मुकुंद पाटे, गणेश गरुडे, गोरख काकडे , युवराज शिंदे, सुमित जाधव यांच्यावतीने करण्यात आले.

महिलांना सन्मान चिन्ह, पुष्कगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन यथोच्छित सन्मान करण्यात आला. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन च्या उपनिरिक्षक प्रमिला क्षिरसागर, ॲड रंजना भोसले, ठाकरवाडी येथील मुलांना मोफत शिक्षण देणाऱ्या समाजसेविका गीता जगताप, शाळा क्रमांक दोन च्या मुख्याध्यापिका वर्षा थोरात, वृद्धाश्रमाच्या संस्थापिका उर्मिला छाजेड, उमाबाई दाभाडे ब्रिगेड अध्यक्ष संस्थापिका वंदना केमसे, यांचा सन्मान करुन त्यांना गौरविण्यात आले.
सदर सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी मुकुंद पाटे, गणेश गरुडे, गोरख काकडे , युवराज शिंदे, सुमित जाधव यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!