ताज्या घडामोडी

कापरी येथे मातृभूमी एज्युकेशन अँड करीअर अकॅडमीत रक्तदान शिबीर

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून कापरी ता.शिराळा येथे रक्तदान शिबीर झाले. मातृभूमी एज्युकेशन अँड करीअर अकॅडमीचे संदीप पाटील यांनी यामागची भूमिका सांगितली, ते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशवासियांना रक्त सांडले आहे.आपण किमान रक्तदान करून गरजू रूग्णाचे जीव वाचवुया.रक्तदान शिबीर राबवून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचे नियोजन होते , त्यानुसार शिबीराचे आयोजन केले व ते यशस्वी झाले.रक्तदान शिबीरामुळे समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना वाढीस लागण्यास नक्कीच मदत होईल. असा विश्वासही श्री.पाटील यांनी व्यक्त केला.
या शिबिरात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, शिक्षक व गावातील तरुणांनी रक्तदान केले. एकूण 30 बॅगा रक्त संकलित झाले.राजारामबापू ब्लड बँक इस्लामपूर या संस्थेचे यासाठी सहकार्य लाभले. सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी शशिकांत पाटील,मिलिंद जोशी,केशव पाटील, प्रशांत पाटील, संजय पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!