ताज्या घडामोडी

शिराळा नगरपंचायत मार्फत श्रमदान नव्याने सुरु

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शिराळा शहराला स्वच्छ, सुंदर,हरित, पर्यावरण पूरक शहर अशी नवीन ओळख मिळवून देऊन शहराचा शाश्वत विकास व्हावा या हेतूने शिराळा नगरपंचायत कार्यालयामार्फत विविध उपक्रम नित्यनेमाने राबविले जातात. त्यातीलच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे श्रमदान. मागील दोन वर्षापासूनच शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा.श्री योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या अभिनव संकल्पनेतूनच आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी शहरात नागरिक संस्था यांच्या सहभागातून विविध सार्वजनिक ठिकाने स्वच्छ करणे व इतर पर्यावरण जतन व संवर्धनाची कामे केली जातात.

या श्रमदानांतर्गत आज दिनांक१८/११/२०२२ रोजी शिराळा नगरपंचायत कार्यालयामार्फत कार्यालयाचे प्रशासक तथा मुख्याधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या वर्षी पावसाच्या कालावधीत लागवड करण्यात आलेल्या विविध जाती व प्रजातींच्या वृक्षाच्या मशागतीसाठी श्रमदान केले. या श्रमदानात नगरपंचायत पथकामार्फत सर्व झाडांना पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होण्याच्या हेतूने गोलाकार आळी करणे, झाडांच्या निर्जीव फांद्या छाटणे, झाडांना आधारासाठी बांबू काठी बांधणे, झाडाच्या बुंध्यातील गवत काढणे, झाडाच्या परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करणे अशी कामे करण्यात आली. यापुढेही दर शुक्रवारी श्रमदान उपक्रम नित्यनेमाने सुरु ठेवण्यात येणार असल्याने प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांनी शहरातील नागरिक व संस्थानाही या अभियानात सहभागी होवून शहराच्या हरित वाटचालीत आपले अनमोल योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!