ताज्या घडामोडी

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा बालेवडी, पुणे येथे

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

मुंबई २७, ऑगस्ट (क्री. प्र.) महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची सन २०२१-२२ ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवडी, पुणे येथे आयोजित केली आहे. सदर वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ठीक १२:३० वाजता होणार असल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशन सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी कळविले आहे. या सभेला महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे आश्रयदाते व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव (संयुक्त चिटणीस, भारतीय खो-खो महासंघ) सुध्दा उपस्थित राहणार आहेत. या सभेत खो-खोचा प्रचार-प्रसार व पुढील वाटचाल या बद्दल सुध्दा चर्चा होणार असल्याचे शर्मा यांनी संगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!