ताज्या घडामोडी

ऊस उत्पादन वाढीसाठी ठिंबक सिंचन आवश्यक. – विजयकुमार सुरूर.कापरी येथील ऊस पिक परिसंवादात प्रतिपादन.

Spread the love

कापरी.ता.शिराळा. ऊस उत्पादन वाढीसाठी ठिंबक सिंचन आवश्यक आहे. असे प्रतिपादन कोठारी इरिगेशन लि.चे कृषीशास्रज्ञ.विजयकुमार सुरूर यांनी केले.ते कापरी येथे कृषी विभाग महाराष्ट्र  शासन (आत्मा), जनाईदेवी शेतकरी बचत गठ व विश्वास सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस पिक परिसंवादात बोलत होते.तालुका कृषी अधिकारी जी.एस.पाटील. प्रमुख उपस्थित होते.

 

श्री.सुरूर पुढे म्हणाले की ऊस पिकास जास्त पाणी दिल्याने उत्पादन जादा मिळते हा गैरसमज शेतकऱ्यांनी काढून टाकावा. उलट जास्त पाण्यामुळे जमिनीत वापसा राहत नाही .या शिवाय पाण्याची नासाडी होऊन जमिनी देखिल क्षारपड बनत आहेत.
ठिंबक सिंचनाने पाण्याची बचत होऊन जमिनिस वापसा मिळतो. त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते.शिवाय तणांचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने होते.ठिंबक सिंचनाचे वेळ,श्रम,पाणी,खते यांची मोठ्या प्रमाणात बचत होते.
ठिंबक सिंचनास शासन आता 80% अनुदान देत आहे शिवाय कारखाने देखिल अनुदान व कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देत आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन देखिल श्री.सुरूर यांनी केले.
यावेळी झुआरी कंपनिचे मार्केटिंग ऑफिसर श्री.विशांत कोळी यांनी कंपनीच्या विद्राव्य खतांविषयी माहीती देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.
या कार्यक्रमास सरपंच मोहन पाटील, कृषी विभाग (आत्मा) चे तालुका समन्वयक अमोल माळी, कृषी सहाय्यक श्रीशैल अजेटराव ,सातलिंग मिटकरी,बचत गटाचे अध्यक्ष अमोल पाटील, कोठारी इरिगेशनचे अमोल जाधव,झुआरीचे संदिप कुईगडे,विश्वास कारखान्याचे आधिकारी,बचत गटाचे सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!