आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

संसद रत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप.

Spread the love

संसद रत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, २२ फेब्रुवारी.

मावळ लोकसभा मतदार संघाचे संसद रत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. इंद्रायणी विद्या मंदिर संचालित श्रीराम विद्यालय नवलाख उंबरे येथे बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच श्रीरंग बारणे फाउंडेशनच्या वतीने शाळेला एलसीडी टीव्ही प्रदान करण्यात आला.
शालेय वस्तूंमध्ये पेपर पॅड, कंपास बॉक्स सेट, व पेन चा सेट आधी वस्तूंचा समावेश आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना मानसिक समतोल साधला पाहिजे असे प्रतिपादन तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी व्यक्त केले.
दहावीतील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबरच पुढील आयुष्याचा आराखडा देखील ठरवला पाहिजे. असे प्रतिपादन जनसेवा विकास समिती प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी केले. याप्रसंगी माजी उपसरपंच नवलाख उंबरे राजू पडवळ, उपाध्यक्ष करण उडाफे, मुख्याध्यापक गणपत कायगुडे, आदींनी मनोगते व्यक्त केली.

 

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, माझी उपसरपंच राजू पडवळ, उपाध्यक्ष करण उडाफे, शिवव्याख्याते श्रीरंग बोऱ्हाडे, मुख्याध्यापक गणपत कायगुडे, शिक्षक विनय गायकवाड ,अशोक धानोकर ,वैशाली माळी, युवराज सोनकांबळे ,सुजाता चव्हाण जयश्री कुलकर्णी, विकास ताजणे सर,आदी मान्यवर उपस्थित होते, तसेच दहावीचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!