ताज्या घडामोडी

पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत संघटना पॅनलचा दणदणीत विजय

Spread the love

पालघर 22 फेब्रुवारी (बातमीदार) पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या झालेल्या निवडणुकीत 15 जागापैकी 12 जागांवर विजय मिळवून पतपेढी विकास व युवाशक्ती पॅनलचा पराजय करून दणदणीत विजय मिळवला

पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीची निवडणूक 21 फेब्रुवारी रोजी मतदान झाले या निवडणुकीत तीन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते आज 22 फेब्रुवारी रोजी पालघर येथे पतपेढी भावनांमध्ये मतमोजणी होऊन एकूण पंधरा जागापैकी12 जागा संघटना पॅनलला तर तीन जागा पतपेढी विकास पॅनल ला मिळाल्या तर युवाशक्तीला एकही जागा प्राप्त झाली नाही
या पतपेढीचे तीन विभाग असून डहाणू तलासरी जव्हार, या विभागातून तीन सदस्य. व वसई विरार भाईंदर ठाणे या विभागातून चार सदस्य, पालघर विभागातून तीन सदस्य, व पाच सदस्य हे जिल्हास्तरावरून निवडून दिले जातात
पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढी ही महाराष्ट्रातील अग्रगण्य पतपेढी म्हणून ओळखली जाते या पतपेढीचे एकूण तीन हजार सभासद असून एकूण भाग भांडवल 17 कोटी 63 लाख व गुंतवणूक पंधरा कोटीची आहे संघटना पॅनल हे गेल्या 53 वर्षापासून निवडून येत आहे हे पतपेढी पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेने स्थापित केलेली आहे पारदर्शक व्यवहार व सभासदासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत पतपेढीच्या सभासदांचा संघटनेवर विश्वास असल्यानेच त्यांनी पुन्हा निवडून दिल्याचे पतपेढीचे माजी अध्यक्ष पी टी पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. व्यक्त
संघटना पॅनलचे निवडून आलेले उमेदवार पालघर विभाग रवींद्र ठाकूर, रंजन दुमाडा, डहाणू विभाग सुहास पारधी, वसई विभाग राजेंद्रकुमार ढगे, नामदेव पाटील, सचिन पाटील, विनोद मिश्रा, व जिल्हास्तरीय विभाग गणेश प्रधान, संतोष पावडे, सुचित्रा पाटील, शुभांगी पाध्ये, रखमा ढोणे,पतपेढी विकास पॅनलचे निवडून आलेले उमेदवार डहाणू विभाग जयंता पाटील, संजय पाटील, व पालघर विभाग प्रमोद पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!