आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज शिव शंभूचा अवतार होते की काय ?

म्हणून महाशिवरात्रीचा महाप्रसाद व शिवजयंती एकत्र आले आणि जणू महाउत्सव  साजरा झाला.

Spread the love

खरोखरंच छत्रपती शिवाजी महाराज शिव शंभूचा अवतार होते  की काय ?  म्हणून महाशिवरात्रीचा महाप्रसाद व शिवजयंती एकत्र आले आणि जणू महाउत्सवच  साजरा झाला.

Truly Chhatrapati Shivaji Maharaj Shiva, Maha Shivratri, Maha Prasad, Shiva Jayanti, Maha Utsavach,

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर. २३ फेब्रुवारी.

अवघे वातावरण दुमदुमून गेले तळेगाव दाभाडे येथील सोपान शिव मंदिर मस्करणीस कॉलनी दोन येथे शिवरात्री व शिवजयंती कार्यक्रम पार पडला. शिवरात्रीनिमित्त अभिषेक, स्वराली भजनी मंडळाचे भजन, दिवसभर उपवासाचे पदार्थांचे वाटप व भाविकांचे दर्शन या स्वरूपात महाशिवरात्र साजरी झाली.

शिवरात्रीपूर्वी आठ ते दहा दिवस मंदिरात सर्व तयारी चालू होती. साफसफाई ,रंगरंगोटी, लाईट ,पाण्याचे नियोजन, मांडव ही सर्व तयारी करून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी साधारण 2000 भाविकांनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमात बाळासाहेब करंडे ,विनायक करंडे त्यांना साथ देणारे मित्रपरिवार, सुर्यकांत काळोखे,काळोखे परिवार ,टकले परिवार शिळीमकर परिवार, जुबेर गोलंदाज ,गोरख टेकवडे ,ओंकार भेगडे आरुडे व इतर या सर्वांच्या सहकार्याने  हा कार्यक्रम पार पडला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मनकर्णिका महिला महासंघाचे शिवजयंती सोपान शिव मंदिर मस्करणीस कॉलनी दोन येथे साजरी झाली. मनकर्णिका महिला महासंघाचे हे 9 वे वर्ष होते यावेळी पारंपारिक वेशभूषेत रॅली काढण्यात आली. यानंतर महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व आरती, पाळणा, पोवाडा यामुळे वातावरण शिवमय झाले. तसेच विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम राबवणाऱ्या सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या मनकर्णिका महिला महासंघाच्या अध्यक्षा. संस्थापिका. विनाताई करंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सर्व कार्यक्रम पार पडला.  त्या म्हणाल्या यातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार दहा टक्के तरी मुलांवरती रुजले गेले असेल अशी मी अपेक्षा करते. यावेळी त्यांच्या मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या सर्व मनकर्णिका महिला महासंघाच्या महिलांनी उत्कृष्टरित्या साथ दिली, अश्विनी मेलांडे व नेत्रा हुलावळे यांनी पाळणा म्हणला.तसेच बालविकास विद्यालयाच्या शौरवी वशिष्ठ, आदित्री वशिष्ठ या विद्यार्थिनी सुद्धा पाळणा म्हणला.

दोन दिवस चाललेल्या स्पर्धेत शितल काळोखे, अर्चना चव्हाण, कीर्ती पाटील सायली वशिष्ठ, ऐश्वर्या खांडगे यांनी साथ दिली. सारिका हुलावळे हिने शिव घोषणा केली. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा यासाठी १७८ विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला. या सर्व स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराजांविषयी निगडीत होत्या. वकृत्व स्पर्धेसाठी  विशाल मोरे सर यांनी परीक्षण केले. सानवी पाटील या चार वर्षाच्या चिमुकलीच्या पोवाड्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. कीर्ती पाटील, मोना ताई भेगडे, सारिका नवले सुजाता मलगे, मयुरी केळवंडे या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभ लवकरच जाहीर केला जाईल असे विणाताई करंडे यांनी सांगितले.

यावेळी महिला वर्गाचा भरभरून प्रतिसाद लाभला.रेशमा पाटील, सारिका काळोखे, सुवर्णा काळोखे, अर्चना काळोखे, शिल्पा चिंचवडे, वृषाली शेळके, शुभांगी भेगडे, सुलोचना चव्हाण, अनिता भेगडे, नलिनी नवगिरे, अश्विनी आंबेकर, कोमल कदम, नीलम खाडे, राजश्री गायकवाड, ललिता बेंगुर्डे, राधा बनकर, सोनाली बनकर, दिपाली बंगाळे, पुष्पा तोडकर, अश्विनी भंडारे, पार्वती शेडगे, वर्षा जगतकर सुप्रिया पाटील, कविता राजपूत, कल्पना बनसोडे, वैशाली रणदिवे यांचे शिवजयंती साठी सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!