ताज्या घडामोडी

सौ. निताताई खोत..रयत क्रांती संघटनेची रणरागिणी

Spread the love

वाढदिवस विशेष..

महाराष्ट्राचे माजी कृषी व पाणी पुरवठा मंत्री मा. श्री. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कार्यरत असलेल्या रयत क्रांती संघटनेच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मा. सौ. निताताई खोत यांच्या आज वाढ दिवस आहे. यानिमित्ताने हा लेखन प्रपंच…….

मांगले ता. शिराळा येथील माहेर असलेल्या व मरळनाथपूर ता. वाळवा हे सासर लाभलेल्या मा. सौ. निताताई कष्णात खोत यांचा वाढ दिवस म्हणजे राज्य भरामध्ये कार्यरत असलेल्या रयत क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा आनंदाचा दिवस. तसे वाढ दिवस अनेकांचे साजरे होतात पण आदरणीय निताताईच्या वाढ दिवसामध्ये खुपच सामाजीक काम लपलेले असते. जवळपास १८ वर्षा पूर्वी आपले छोटेशे मरळनाथपूर गांव सोडून मुंबई सारख्या राज्याची राजधानी असलेल्या मोठ्या शहरात नोकरी व्यवसायाच्या माध्यमातुन रहिवाशी होणे व या ठिकाणचे वातावरण व कामात गुंतुन राहणे म्हणावे तेवढे सोपे राहिलेले नाही. तरीही मुंबईमध्ये प्रारंभीच्या काळात खडतर जिवन जगत हाल अपेष्टा सहन करत त्यांनी आपला आज प्रपंचा फुलविला आहे. आदरणीय निताताई खोत यांचे मोठे दिर श्री. सयाजीराव खोत हे ही आपल्या परिवासह नवी मुंबई येथे वास्तव्यास असतात त्यांचाही आधार व पाठबळ समाज कार्यात लाभत असते. सर्व परिवार त्यांचे मुले बाळे सुखा समाधानाने आपले जिवन जगताना दिसत आहेत.

सौ. निताताईच्या अंगी असणारा समाजसेवेचा गुण काही केल्या त्यांना गप्प बसुन देत नव्हता म्हणून त्यांनी नवी मुंबई येथे महिला सह ठराविक पुरूष मंडळीना एकत्रित करून ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट, नवी मुंबईची स्थापना केली. या माध्यमातुन समाज सेवेस प्रारंभ केला बघता नवी मुंबई सह उपनगरांमध्ये निताताईच्या नेतृत्वात महिलांचे मोठे जाळे तयार होताना दिसत आहे. महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते, मा. श्री. सदाभाऊ खोत यांनी निताताईच्यातील समाज सेवा व वक्तृत्वाचे गुण हेरले व महाराष्ट्राचे उपमुखमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत टेबुर्णी जि. सोलापूर येथे शेतकरी –
आक्रोश यात्रेच्या सांगता समारंभात रयत क्रांती संघटेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी निताताई यांच्या वरती सोपविली प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारत असताना निताताईच्या समोर प्रचंड मोठे अवाहन होते. परंतु कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता आज राज्यव्यापी दौरा करण्याची धमक आदरनिय निताताईच्या मध्ये निर्माण झाली आहे व त्या राज्यात सर्वत्र महिलांचे संघटन व एकत्रिकरण करतात. मध्यंतरीच्या काळात मंत्रालयावरती तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरती निरनिराळी व निरनिराळ्या पध्दतीने आंदोलने झाली यामध्ये दुधाचे आंदोलन असेल, एस. टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे निरनिराळे शेती व पाण्या संबंधातील प्रश्न असतील, स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांच्या मागण्या असतील, आर्मी फौजीत भरती होणाऱ्या तरुणांच्या अडी अडचणी या सर्व आंदोलनात माजी कृषी मंत्री मा. श्री. सदाभाऊ खोत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीससाहेब , आमदार श्री. प्रविणजी दरेकर साहेब, आमदार मा. श्री. गोपिचंद पडळकर साहेब, मा. आ. आशिष शेलार साहेब, भा. ज. पा. प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ, यांच्यासह रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकारी यांच्या बरोबरीने निताताई आंदोलनात सक्रिय व हिरिरीने आपला सहभाग नोंदवित असतात.

गरीबातील गरीब व्यक्ती उपासपोटी रहाता कामा नये, बे – वारस व्यक्तीना पुरेश आंतरूण पांगरून मिळावे, अनाथ भुकेल्या व्यक्तीना नेहमीच निताताईचा मदतीचा हात पुढे असतो. अशा आमच्या सौ. निताताई यांना वाढ दिवसानिमित्त मनापासुन लाख लाख हार्दिक शुभेच्छा…… परमेश्वरास एकच मागण आहे समाज सेवेचे व्रत हाती घेतलेल्या ताईच्या हातांना मोठं बळ मिळू दे… ताई आम्ही सर्वजन तुमच्यात मुंबईच्या नगरसेवक, आमदार अशा स्वरूपात पाहण्याची संधी लवकर मिळावी याच आमच्या मनापासुन सदिच्छा व वाढ दिवसाच्या मनपुर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.रयत क्रांती संघटना महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!