ताज्या घडामोडी

शेणोली ता. कराड येथे आखिल भारतीय वडार महासंघाच्या वतीने शाखा उदघाट्न

Spread the love

नेर्ले (ता. वाळवा ) शेणोली ता. कराड येथे आखिल भारतीय वडार महासंघाच्या वतीने शाखा उदघाट्न तसेच नूतन सातारा जिल्हा अध्यक्ष पदी बाजीराव शिंगाडे ( नाना )यांची निवड……… सविस्तर असे कि, अखिल भारतीय वडार महासंघ ही एक सामाजिक संघटना असून ही संघटना एक सामाजिक कामाचा वारसा जपत अग्रेसरी आहे, या संघटनेने बरेच कामे सामाजिक माध्यमातून गोरगरिबांची कामे करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे. शेणोली ता. कराड येथे सातारा जिल्ह्यात नूतन सातारा जिल्हा अध्यक्ष मा. बाजीराव शिंगाडे (नाना )यांची निवड अखिल भारतीय वडार महासंघ संस्थापक अध्यक्ष मा. कमलाकर वडार साहेब व शिवाजी भोसले अखिल भारतीय वडार महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या हस्ते निवड पत्र, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वास शिंगाडे, माणिक पवार, नामदेव पवार, रमेश साळुंखे, देवप्पा माने, अरुण जगताप, अनिल साळुंखे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!