ताज्या घडामोडी

डालमिया भारत फौंडेशनचे काम प्रेरणादायी : आप्पासाहेब पवार

Spread the love

कोकरुड/वार्ताहर
दालमिया भारत फाउंडेशनचे समाज उपयोगी कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब पवार यांनी केले ते शेडगेवाडी ता. शिराळा येथील सोनियाजी हॉटेल हॉल मध्ये
दालमिया भारत फाउंडेशन व दालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ई लर्निंग टीव्ही संच, कॉम्प्युटर सेट, सोलर स्ट्रीट लाईट वाटप कार्यक्रमात बोलत होते.यावेळी जनरल मॅनेजर टेक्निकल दिल्ली ऑफिसचे परम सिंग , दालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवीचे युनिट हेड संतोष कुंभार, माजी सभापती हणमंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले की दालमिया भारत फाउंडेशन या संस्थेच्या वतीने शिराळा पश्चिम भागातील शाळांना शैक्षणिक साहित्य , तसेच पुरपरिस्थितीत नुकसान ग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आदीं विविध उपक्रम सातत्याने राबवित आहेत.हा विधायक उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दालमिया भारत फाउंडेशनच्या वतीने शेडगेवाडी परिसरातील दहा शाळांना ई लर्निंग टीव्ही संच, सात शाळांना कॉम्प्युटर सेट व वीस गावांना सोलर स्ट्रीट लाईट भेट देण्यात आल्या. या कार्यक्रमास
गटशिक्षण अधिकारी अजिक्य कुंभार , सोनियाजी पतसंस्थेचे बाजीराव शेडगे, नाठवडेचे सरपंच बाजीराव मोहिते, दालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवीचे एच आर हेड महेश कवचाळे , ऊस विकास अधिकारी युवराज चव्हाण , युनियन अध्यक्ष निवृत्ती नायकवडी , नरेश देशमुख ,विक्रम घोलप आदींसह परिसरातील शाळेचे शिक्षक ,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील कांबळे यांनी केले तर आभार ॲडमिन ऑफिसर शिवाजी पाटील मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!