ताज्या घडामोडी

खासदार, प्रसिद्ध अभिनेते मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे ह्यांच्या हस्ते डॉ.अशोक घोणे यांचा सत्कार

Spread the love

माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण
म्हणजे सामाजिक क्षेत्रातील माझे उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्रातील शिरूरचे लोकप्रिय,लोकसभा खासदार, प्रसिद्ध अभिनेते मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे ह्यांच्या हस्ते झाला.

त्यांच्या गाजलेल्या प्रसिद्ध मालिका ” राजा शिवछत्रपती”, व सर्वात जास्त प्रसिद्धी मिळालेली “स्वराज्य रक्षक संभाजी ” मालिकेतील प्रमुख भूमिकेत असणारे,अभिनेते डॉ अमोल कोल्हे. हे माझ्यासाठी मोठे, गौरवाचे स्थान आहे. त्यांच्या हस्ते माझा सत्कार हे माझ्यासाठी खूपच अभिमानाची, भाग्याची गोष्ट आहे.

परमेश्वर डॉ कोल्हे साहेबांना उदंड आयुष्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.त्यांच्या येणाऱ्या वाढदिवसानिमित्त
आम्ही मोफत हृदयविकार शिबिराचे आयोजन करीत आहोत.शिबिरामध्ये लहान मुलांच्या साठी वय 3 महिने ते 12 वर्ष हृदयाच्या सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार आहे, हृदयाला छिद्र असणे, हे विना टाकेने डिवाइसच्या साह्याने बंद करणे, या प्रोसिजर सिनिअर हृदयरोग तज्ञांच्या हस्ते होणार आहे .
शिबिरामध्ये अँजिओग्राफी फक्त रू4,500/ मध्ये होणार आहे . एन्जोप्लास्टी पूर्णपणे मोफत होणार आहे
हे शिबिर रविवार दिनांक 18/9/2022 ते 18/10/20 22 पर्यंत आहे . यासाठी बरेचशे संस्था आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येत आहेत,तरी
महाराष्ट्रातील सर्व गरजु लाभार्थ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा ,असे आवाहन डॉ अशोक घोणे यांनी एम्स रुग्णालया मार्फत केले आहे

आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सविनय सादर!
डॉ अशोक घोणे.रुग्ण व सामाजिक कल्याण प्रमुख.
एम्स हॉस्पिटल, रिसर्च सेंटर औंध पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!