ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत निवडीसाठी दुसऱ्या टप्प्यात संस्थांकडुन दि. १० ऑक्टोंबर २०२२ पर्यंत अर्ज मागविले

Spread the love

मॅग्नेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यात शेतकरी उत्पादक संस्था, मा.वि.म. स्थापित लोकसंचलित साधन केंद्र. महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियांना अंतर्गत स्थापित प्रभाग संघ, उत्पादकांच्या सहकारी संस्था, प्रक्रियादार, निर्यातदार, अॅग्रिगेटर, मध्यम व मोठ्या रिटेल विक्री संस्था, कृषि तंत्र वा आर्थिक तंत्र संस्था इ. कडुन अर्ज मागविण्यात येत आहेत.

राज्यातुन उपरोक्त पात्र अर्जांचे मुल्यांकन करुन मुल्यांकन निकषानुसार पहिल्या ६० लाभार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यात निवड करण्यात येणार आहे. यामध्ये ४० शेतकरी उत्पादक संस्था व २४ मुल्यसाखळी गुंतवणुकदार यांची निवड करण्यात येणार आहे.

राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रियेसह विपनन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मँगनेट प्रकल्प कार्यान्वितः

उत्पादन ते ग्राहक अशा एकात्मीक मुल्य साखळ्याच्या विकासासाठी या प्रकल्पाची आखनी केलेली आहे.

मँगनेट प्रकल्पाची अमलबजावणी राज्यात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळा मार्फत करण्यात येत

आहे.

मँगनेट प्रकल्पाचा मुख्य उद्देश मुल्यसाखळ्यामध्ये खाजगी गुंतवणुक आकर्षित करणे, काढणी पश्चात नुकसान कमी करणे, साठवणुक क्षमता वाढविणे. मागणीनुसार मालाची मुल्यवर्धी करणे, अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे व शेतकरी उत्पादक संस्थाचा मुल्यसाखळीतील सहभाग वाढविणे.

मँगनेट प्रकल्पाचे प्रमुख तीन घटक १. शेतकरी उत्पादक संस्थाचा क्षमता विकास. २. काढणी पश्चात सुविधासाठी अर्थसाह्य ३. निवडलेल्या पीकासाठी मुल्य साखळ्या विकसन. कोल्हापूर विभागातून प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्यात ०४ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि १

सहकारी संस्थेची निवड करण्यात आलेली आहे.

पात्र लाभार्थ्याना प्रकल्प खर्चाच्या अधिकतम ६० टक्के पर्यंत अर्थसाह्य देण्यात येणार आहे.

सदर प्रकल्प हा रक्कम रु. १०६७ कोटीचा असुन त्यापैकी रक्कम रु. ७४६ कोटी (७०टक्के) आशियाई विकास बँकेकडुन कर्ज स्वरूपात असणार आहेत. उर्वरित ३० टक्के रक्कम रूपये ३२१ कोटी राज्य शासनाचा स्वनिधी असणार आहे.
कोल्हापुर विभागातील डाळींब, केळी, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल), फुल पिके इ. पिकांचा मॅग्नेट प्रकल्पात समावेश आहे.

प्रकल्पाचा कालावधी सहा वर्षाचा असून, सन २०२६ २७ पर्यंत सदर प्रकल्प राज्यात राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळच्या संकेतस्थळावर अर्जासाठी लिंक देण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्यासाठीचा नमुना www.msamb.com या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

Online अर्ज सादर करावयाची अंतिम तारिख दि. १० ऑक्टोंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे. तदनंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत.

अर्जदाराची नोंदणी करून अर्ज व मार्गदर्शक सुचना लिंक डाउनलोड करून लाभार्थ्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे online submit करावी.

ईमेलद्वारे सादर केलेले लाभार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत.

अर्जदारानी विहित नमुन्यातील अर्ज भरून चेक लिष्ट प्रमाणे आवश्यक कागदपत्रे सह महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कोल्हापुर येथील विभागीय कार्यालयात सादर करावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!