ताज्या घडामोडी

शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी केली सहशालेय उपक्रमांना सुरुवात

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी तारीख १५

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांमध्ये झालेला अध्ययन नुकसान भरून काढण्यासाठी आणि गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे टप्प्ट साध्य करण्यासाठी व सन 2022 – 2023 या शैक्षणिक शैक्षणिक उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी करणे महत्त्वाचे ठरत आहे. या अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच सहशालेय उपक्रम सुध्दा राज्यात राबवले जात आहेत. शैक्षणिक वर्ष सन 2022 – 2023 अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

शैक्षणिक गुणवत्ता वृध्दि वर्ष सन 2022 – 2023 अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम शाळा शाळांमध्ये राबविले जात आहेत. मुंबईतल्या हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत सहशालेय उपक्रम राबविण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावदेण्यासाठी एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण निरीक्षक नवनाथ वणवे यांनी आपल्या विभागातील अनेक शैक्षणिक संस्थांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये संवाद साधून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी उत्तमोत्तम स्पर्धाचे आयोजन करून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये चेतन्य निर्माण केले. केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक यांनी विज्ञान प्रदर्शनात सादर केलेले प्रकल्प कोविड 19 नंतर उल्लेखनीय होते.या प्रदर्शनात प्रथम पुरस्कार प्राप्त हितेंद्र राठोड प्रयोग शाळा सहाय्यक यांचे अभिनंदन मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांनी केले.

विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत क्षमता विकसित करणे. विद्यार्थ्यांच अध्ययन वृद्धी करण्यासाठी राज्य स्तरावरून शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करून अंमलबजावणी साठी मार्गदर्शन करणे यावर भर देण्यात येणार आहे.

सहशालेय उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी फारच उपयुक्त ठरतील. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व मोबाईलपासून दूर राहण्यासाठी अशा स्पर्धा नेहमीच प्रेरणादायी ठरतील असे मत ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केले. या स्पर्धेसाठी आर. सी. पटेल हायस्कूल मधील शिक्षिका सीमा नलावडे व व सय्याली वैश्यफन्न यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!