ताज्या घडामोडी

क्रांतीवीर पांडू मास्तर यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या तरुण पिढीने जागरूकपणे कार्यमग्न राहिले पाहिजे

Spread the love

रयत क्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मा.श्री. लालासाहेब पाटील

येडेनिपाणी, ता. वाळवा येथील थोर सुपुत्र, स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिवीर पांडू मास्तर यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, नेर्ले गावचे माजी आदर्श सरपंच मा. लालासाहेब पाटील यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थित. स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिवीर पांडू मास्तर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मा. श्री. लालासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाळवा पंचायत समिती सदस्य माजी सदस्य मा. श्री. नंदकुमार पाटील, रयत क्रांती संघटनेचे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मा. बजरंग भोसले, मा. राजेंद्र पाटील, मा. अक्षय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!