ताज्या घडामोडी

कै. एकनाथ साटम जेष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्कार” उदय देशपांडे, चंद्रकिरण सकपाळ यांना जाहीर

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

मुंबई, १७ सप्टेंबर, (क्री. प्र. ) : मुंबई खो-खो खो संघटनेची सन २०२१-२२ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १८ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक ६:०० वाजता संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार लाड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

खो-खो क्षेत्रात केलेल्या अमूल्य कार्याचा व दिलेल्या योगदनाचा गौरव म्हणून या सभेनंतर “कै. एकनाथ साटम जेष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्कार” श्री समर्थ व्या. मंदिर, दादारचे प्रमुख कार्यवाह उदय देशपांडे व समता सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकिरण सकपाळ यांना देऊन गौरवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाचा दादोजी कोंडदेव पुरस्कार व शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार मिळवलेल्या उदय देशपांडे यांनी श्री समर्थ व्या. मंदिरच्या खो-खो संघ बांधणीस नेहमीच प्रोत्साहन दिले. ते राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षा प्रथम क्रमांकाने पास झाले होते. श्री समर्थ व्या. मंदिरचा खो-खो संघ एके काळी भारतात अव्वल होता. त्याचबरोबर विविध खो-खो स्पर्धा श्री समर्थ व्या. मंदिरने भरवल्या आहेत. तसेच खो-खोच्या विविध उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. याच बरोबर विविध संस्थांनी उदय देशपांडे यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर एक अर्जुन पुरस्कार प्राप्त विजेती खेळाडू, शंभरहून अधिक राष्ट्रीय खेळाडू, तीन क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त विजेते प्रशिक्षक व चौदा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू घडले आहेत.

मुंबई महानगर पालिकेतून उच्च सुरक्षा अधिकारी म्हणून निवृत्त झालेले चंद्रकिरण सकपाळ यांनी क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चंद्रकिरण सकपाळ हे समता सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून या संस्थेच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती चषक व सुवर्णस्मृती चषकांचे विविध भव्य किडा स्पर्धा डिलाईल रोड विभागात भरविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कै. जीवन कुवेकर यांच्या स्मरणार्थ जीवन प्रबोधन व्याख्यानमालेचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. विविध स्पर्धा आयोजनाबरोबर खो-खोच्या विविध स्तरावरच्या भव्य स्पर्धांचे आयोजन यशस्वी रित्या पार पाडले. याच बरोबर समता सेवा मंडळाचा खो-खो संघ सुरू करण्यात भक्कम पाठिंबा दिला. तसेच बाळासाहेब तोरसकर यांच्या मरगदरशनाखाली पहिली महिला राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा व मॅट वरील पहिली जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा आयोजनाचा मान समता सेवा मंडळ व चंद्रकिरण सकपाळ यांना जातो.

या दोघांनी क्रीडा क्षेत्रात व विशेषत: खो-खो क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना “कै. एकनाथ साटम जेष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्कार” देऊन मुंबई खो-खो संघटने तर्फे गौरवण्यात येत आहे.

सदर सर्वसाधारण सभेला राज्य संघटनेचे निरीक्षक नरेंद्र कुंदर यांच्यासह संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब (बाळ) तोरसकर, रवी पाष्टे, पांडुरंग परब, कार्याध्यक्ष सुधाकर राऊळ, प्रफुल्ल पाटील, प्र. कार्यवाह सुरेन्द्र विश्वकर्मा, खजिनदार जतिन टाकळे, विकास पाटील, श्रीकांत गायकवाड, चंद्रकांत तरळ, डलेश देसाई, तुषार सुर्वे, ॲड. अरुण देशमुख आदि मार्गदर्शन करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!