ताज्या घडामोडी

दानशूर व्यक्तिमत्त्व विजय महादेव सुर्वे यांच्याकडून मालगुंड शिक्षण संस्थेला १ लाख रुपयाची देणगी.

Spread the love

जाकादेवी/ वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्तिमत्त्व श्री विजय महादेव सुर्वे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ मालगुंड एज्युकेशन सोसायटीला १ लाख रुपयांची देणगी दिली.
श्री विजय महादेव सुर्वे यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर रत्नागिरी येथे नाईक कंपनीमध्ये अकाऊंटट म्हणून अतिशय निष्ठेने काम केले.काही दिवसांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. ज्या संस्थेच्या शाळेमुळे मी शिकलो, नोकरीला लागलो ते ऋण कधीही न संपणारे आहे,शाळा संस्थेविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी सामाजिक बांधिलकीतून भरीव देणगी शाळेला दिली. शाळेच्या जडणघडणीत आपले सुद्धा योगदान असावे या उदात्त हेतूने त्यांनी ही देणगी संस्थेला दिली. माझ्याप्रमाणे इतरही माजी विद्यार्थ्यांनीही शाळा व शिक्षण संस्थेला आपल्या परीने मदत करण्याचे आवाहन दानशूर व्यक्तिमत्त्व विजय सुर्वे यांनी केले.
या देणगीबद्दल मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्यावतीने विजय सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला.देणगीचा धनादेश त्यांनी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
याप्रसंगी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री विनायक राऊत, खजिनदार श्री संदीप कदम, संचालक व पंचायत समिती चे सदस्य श्री गजानन उर्फ आबा पाटील, संचालक श्री माधव घनवटकर,निमंत्रित संचालक श्री श्रीकांत मेहेंदळे, श्री दिवाकर पवार, श्री विजय महादेव सुर्वे यांचे मोठे बंधू श्री प्रकाश सुर्वे, सुर्वे कुटुंबीय, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.नामदेव वाघमारे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमित जाधव यांनी केले, तर आभार श्री बाबासो बेडक्याळे यांनी मानले.-मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बंधू मयेकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द करताना विजय सुर्वे कुटुंबीय, सोबत संस्थेचे पदाधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!