ताज्या घडामोडी

कांदिवली मध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी जी यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

भारत कवितके मुंबई कांदिवली
कांदिवली पश्चिम मधील भारतीय जनता पार्टी चारकोप विधानसभा वार्ड क्रमांक २० व्दारा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरावडा दिनांक १७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर २०२२ पर्यंत मोफत आरोग्य शिबीर,शालेय मुलांना शालेय साहित्य वाटप,रुग्णाना फळे वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी चारकोप विधानसभा वार्ड क्रमांक २० मध्ये भाजपा वार्ड क्रमांक २० अल्पसंख्यांक मोर्चा आघाडी मार्फत शालेय मुलामुलींना वह्या,पुस्तके रबर,शापनर,पेन्सिल,आदि वस्तुचे वाटप करण्यात आले,यावेळी अध्यक्ष ईतियाक खान,अफजल खान,दिनेश जयस्वाल, भारत कवितके सकिना,नूर बानो,साफिया शेख,रहमत बानो हसीना आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर ट्रायडेंट रुग्णालयातील वैद्यकिय आधिकारी मेघा म्हापणकर,वैद्यकीय आधिकारी रोहन उपाध्याय,नर्स निकीता मोरे, नर्स निशा पवार,फर्मासिस्ट मनिषा झा,संतोष यादव या समुहा मार्फत रुग्णाची साधी तपासणी, स्त्री रोग तपासणी, आर्थोपेडिक, ई.सी.जी.व रक्ततपासणी शंकर मंदिर,शिवशक्ती कंपाऊंड, गांधीनगर कांदिवली पश्चिम येथे करण्यात आली. या वेळी चारकोप विधानसभा भाजपा अध्यक्ष व मा.नगरसेवक बाळा तावडे,, संजय सिंह, योगेश पडवळ, सतदेव सिंह,अजय सिंह, भारत कवितके, आर.एस.वर्मा,शमशुद्दीन चौधरी,विजय पाल,महेंद्र यादव,सह भाजपा चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!