ताज्या घडामोडी

शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे त्यांच्या तत्वांवर श्रद्धा ठेवून जुन्या गुरुदेव कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळेच विवेकानंद संस्थेचा नावलौकिक वाढण्यास मदत झाली ; कौस्तुभ गावडे

Spread the love

मसूचीवाडी ता वाळवा येथे संजय माने यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

इस्लामपूर दि 17 (प्रतिनिधी )श्री स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील युवाभारत उभारण्याचे ध्येय उराशी ठेवून शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी
डॉ.बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद शिक्षण संस्थेतील संजय माने यांच्या सारख्या जुन्या गुरुदेव कार्यकर्त्यांनी त्यांच्या तत्वांवर श्रद्धा ठेवून ग्रामीण भागातील सामान्य विद्यार्थी केंद्रबिंदू मानून केलेल्या कामामुळेच हे शक्य झाले व संस्थेचा नावलौकिक वाढला असे प्रतिपादन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले.
ते मसूचीवाडी ता वाळवा येथील तुकाराम सावळा कदम विद्यामंदिरातील जेष्ठ शिक्षक संजय माने यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य मिलींद हुजरे हे होते.यावेळी संजय माने यांचा सपत्नीक सत्कार संस्थेचे सी इ ओ कौस्तुभ गावडे व मुख्याध्यापिका सौ.एस.ए.पाटील यांचे हस्ते केला व प्राचार्य मिलिंद हुजरे यांनी संस्थेच्या वतीने मानपत्र व सन्मान चिन्ह दिले . यावेळी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर च्या आय. क्यू. ए .सी . प्रमुख प्रा.डॉ.श्रुती जोशी ,माजी व्यवस्थापक मंडळ सदस्य अविनाश कदम,माजी आजीव सेवक वाय. बी.होरे,जी.आर.पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कौस्तुभ गावडे म्हणाले आजच्या स्पर्धेच्या युगात कौशल्यपूर्ण शिक्षण ही काळाची गरज बनत चालली आहे म्हणून गुणवत्तावाढी बरोबच शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिक्षणातील नवनवीन बदल आत्मसात करणे गरजेचे आहे.अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य मिलिंद हुजरे म्हणाले संजय माने यांच्या सारख्या गुरुदेव कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यातून डॉक्टर, इंजिनिअर,वकील ,पोलीस अधिकारी घडविले व डॉ. बापूजी साळुंखे यांचे गरीब व बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे स्वप्न पूर्ण केले .
यावेळी सत्काराला उत्तर देताना संजय माने म्हणाले शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे व व्ही.एन.पाटील,एन.के.डुके यांच्या मुळे शिक्षणाची ज्ञानगंगा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचली व मला शिक्षक बनण्याची संधी उपलब्ध झाली.29 वर्षे ज्ञानदान करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.यावेळी त्यांनी विद्यालयाला 10 हजार रुपयांची देणगी दिली.
या कार्यक्रमाला संपर्क प्रमुख अविनाश मोहिते,मसूचीवाडीच्या सरपंच सौ. राधिका पाटोळे,उपसरपंच शांताराम कदम, माजी सरपंच सुहास कदम, बी.पी.कदम,नागेश कदम,
शिवाजी सावंत ,शंकर कदम,ग्रा. पं. सदस्या सुनीता फाटक, सौ.शोभा कदम,पोलिस पाटील विक्रम कुंभार,नागराळे च्या सरपंच सौ. वनिता पाटील, मुख्याध्यापक डी. टी. जाधव हे उपस्थित होते
मुख्याध्यापिका सौ.एस.ए. पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.सौ.एस.आर.कदम यांनी सूत्रसंचालन केले ,बी. आर.संकपाळ यांनी आभार मानले यु.बी.जाधव,सौ.एम.बी.फाटक,श्रीमती. व्ही.एस.रोकडे,मनोज कदम,गौरी पाटील, रमेश पाटोळे यांनी संयोजक केले.मसुचीवाडी ता वाळवा येथे संजय माने यांच्या सेवानिवृत्ती निमित्त संस्थेचे सी.इ .ओ कौस्तुभ गावडे व मुख्याध्यापिका सौ.एस.ए.पाटील यांचे हस्ते सत्कार केला.यावेळी प्राचार्य मिलिंद हुजरे, प्रा.डॉ.श्रुती जोशी, अविनाश कदम, यु बी जाधव, उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!