ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या जगण्याचं वास्तव चित्रण कवितेतून मांडणं आवश्यक ” -जेष्ठ कवी प्रा . सुनील दबडे

Spread the love

शेतकरी शेतात गुरांसारखं राब राब राबतो . कष्ट उपसतो . पण त्यानं शेतीत घातलेले पैसे पण त्याला धड मिळत नाहीत . मालाला नीट बाजारभाव मिळत नाही . शेतकऱ्यांना जगणंच मुश्किल झालेलं आहे . शेतक ऱ्यांच्या जगण्याचं भिषण वास्तव कवितेतून मांडणं आवश्यक आहे . असे मत जेष्ठ कवी प्रा . सुनील दबडे यांनी व्यक्त केले .
देवराष्ट्रे (ता. कडेगाव ) येथील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात वृक्षमित्र धों. म . मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट व खानापूर – कडेगाव तालुका मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” आपली शिदोरी आपले संमेलन ” . या कार्यक्रमात दुसऱ्या सत्रातील कवी संमेलन अध्यक्ष पदावरून प्रा . सुनील दबडे बोलत होते .
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, दुष्काळी भागांत शेतकऱ्यांनी ऊसाचे पीक घेतले . परंतु अनेक ठिकाणी ऊस शेतांतच वाळून गेला . टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी भागांत आले परंतु ते शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत किती पोहचले . यामुळे शेतकऱ्यांचे दैन्य कमी झाले का …? कष्टकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी , व्यसनाधिनता, महिलांची असुरक्षितता, अंधश्रद्धा , असे अनेक गावगाड्या तले , शेती मातीतले प्रश्न कवितेत दमदारपणे येणे आवश्यक आहेत .
जपान आणि रशिया या देशांमध्ये लेखकांना कवींना आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्याकडून पुस्तके लिहून घेण्याचा प्रयोग यापूर्वी करण्यात आला होता . त्या प्रयोगाचा माणूस घडण्याच्या कामी चांगला उपयोग झाला . तसाच प्रयोग आपल्या राज्य सरकारने राबविल्यास माणूस घडण्याच्या कामी पर्यायाने निकोप समाज व्यवस्था घडेल असे मत प्रा सुनील दबडे यांनी व्यक्त केले .
आपली शिदोरी आपले संमेलनाच्या संयोजकांचे व सहभागी जिल्हाभरातील कवींचे प्रा . दबडे यांनी कौतुक केले . ते पुढे म्हणाले की, स्वानंद , मनोरंजन , प्रबोधन , परिवर्तन असे काव्यलेखनाचे हेतू आहेत . दमदार कवितांमुळे काव्य संमेलनाचा संयोजकांचा हेतू सफल झाला आहे .
यावेळी खानापूर कडेगाव साहित्य परिषदेचे अध्यक्ष आनंदराव पाटील , उपाध्यक्ष विश्वनाथ गायकवाड , कार्याध्यक्ष रघुराज मेटकरी, सुप्रसिद्ध गझलकार सुधाकर इनामदार , संशोधक व अभ्यासक कवी डॉ. रामदास नाईकनवरे, प्रा. संताजी देशमुख , शाहीर हरिभाऊ गळवे, सदानंद माळी , एम . बी . जमादार , शांतीनाथ मांगले , अरुण कांबळे बनपुरीकर , रमझान मुल्ला, हिंमत पाटील यांच्यासहीत जिल्ह्यातील अनेक कवी साहित्यिक उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!