ताज्या घडामोडी

पोलीस कर्मचारी अवधूत इंगवले व मित्रपरिवाराने अपघातात मृत वानरावर केले अंत्यसंस्कार.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शिराळा बायपास रोडवर आज मंगळवारी एका अनोळखी गाडीने धडक दिल्यावर एक वानर मारले गेले. मयत वानराचे वृत्त समजताच शिराळा येथील सामाजिक कार्यकर्ते व शिराळयाचे आ. मानसिंगराव नाईक यांचे सुरक्षा रक्षक तथा सांगली पोलीस दलातील कर्मचारी अवधूत इंगवले यांनी सामाजिक बांधिलकी जपत या मृत्यू पावलेल्या वानराचा पुढील सर्व अंत्यविधी अवधूत इंगवले मित्र परिवार व युवाशक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी राकेश इंगवले,मंगेश लोहार, राज पाटील,विनायक लोहार,मतीन मुल्ला,कीर्ती लोहार,विशाल लोहार, अक्षय सुतार,पंकज हवालदार,होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!