ताज्या घडामोडी

लोणावळा शहरात आमदार सुनिलआण्णा शेळके यांचा नागरी सत्कार करण्यासाठी आयोजन.

मराठा आरक्षण प्रश्नावर विरोध होण्याची शक्यता..

Spread the love

लोणावळा शहरात आमदार सुनिलआण्णा शेळके यांचा नागरी सत्कार करण्यासाठी आयोजन ; मराठा आरक्षण प्रश्नावर विरोध होण्याची शक्यता..

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी १६ डिसेंबर.

लोणावळा शहरात विकास कामाकरीता सुमारे शंभर कोटी निधी आमदार सुनिलआण्णा शेळके यांचे प्रयत्नाने आला असल्याने कार्यसम्राट आमदार.सुनिलआण्णा शेळके यांचा ता.१६ रोजी भव्यदिव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
सत्कारासाठी लोणावळा नगरपरिषद इमारतीसमोर भव्यदिव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.

उपजिल्हा रूग्णालयाचे धर्तीवर रूग्णालय इमारतीसाठी ४१कोटी, रस्ते, पूल, तलाठी व मंडलअधिकारी कार्यालय इमारतीसाठी आणि लोणावळा शहर पोलिस स्टेशन व लोणावळा ग्रामिणचे पोलिसस्टेशन इमारतीसाठी असा एकूण शंभर कोटी निधी आमदारांचे प्रयत्नाने आला आहे.
टायगर पाॕईंट, येथे भव्य स्कायवाॕक प्रकल्पासाठी राज्याचे उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दाखविला असून सुमारे ३३३.५६कोटी निधी या प्रकल्पासाठी येणार आसल्याने शहरात पर्यटनस्थळे आणखी विकसित होऊन बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

लोणावळ्यात नगरपरिषद इमारतीसमोर सकाळी १० वाजता हा भव्य नागरी सत्कार होणार असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तर्फे भगवान महावीर चौक ते छञपती शिवाजी महाराज चौकापर्यत मोटारसायकल रॕली काढणार आहे.
या वेळी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक निघणार असल्याने लोणावळ्यात जोरदार तयारी सुरू आहे.

नेते, पक्ष यांना सकल मराठा समाजाचा विरोध : शहरात व खेड्यात गावोगावी मराठा आरक्षण करीता क्रांतीवीर मनोजभाऊ जरांगे पाटील यांचे मार्गदर्शनासाठी विरोध असून त्यांचे पाठिंब्यासाठी साखळी उपोषणे सुरू आहेत.
त्यामुळे उद्याचे कार्यक्रमासही मराठा समाजातर्फे तीव्र विरोध दर्शविण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे विश्वसनीय सुञांकडून समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!