क्राईम न्युजमावळलोणावळा

उपविभागाचा चार्ज घेतल्यापासुन अवैध धंद्यांविरोधात व बेकायदेशीर कृत्य करणा-यांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या.सत्यसाई कार्तिक, लोणावळा विभाग, पुणे ग्रामीण चे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा. पोलीस अधिक्षक

कामशेत बाजारपेठमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला इ. ची अवैधपणे विक्री होत असलेल्या दुकानदारांवर कारवाई.

Spread the love

लोणावळा विभाग, पुणे ग्रामीण चे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा. पोलीस अधिक्षक 
सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा चार्ज घेतल्यापासुन अवैध धंद्यांविरोधात व बेकायदेशीर कृत्य करणा-यांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, १६ डिसेंबर.

 

सहा. पोलीस अधिक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांना कामशेत बाजारपेठमध्ये काही ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित
असलेल्या गुटखा, पानमसाला इ. ची अवैधपणे विक्री होत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली
होती.

त्यावरून दि.१४/१२/२०२३ रोजी रोजी सहा. पोलीस अधिक्षक. सत्यसाई कार्तिक यांचे
मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभाग व कामशेत पोलीस स्टेशनच्या पथकाने शिताफीने सापळा रचुन
केलेल्या कारवाईत कामशेत बाजारपेठेतील १ ) भरत चंपालाल जैन यांच्या मे. शिवम टेडर्स, छत्रपती
शिवाजी महाराज चौक, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे या दुकानाचे गोडाउनमधुन, तसेच २) घिसाराम
सुखराज चौधरी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामशेत येथील मेट्रो मेडीकलचे बाजुस
असलेल्या किराणा दुकानामधुन व राहते घरातुन, व ३ ) महावीर सुखराज जैन यांच्या भोला ट्रेडर्स,
छत्रपती संभाजी महाराज चौक, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे या दुकानामधुन महाराष्ट्र राज्यात
प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला इ. पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणावर मिळुन आल्याने त्यांचेवर
कामशेत पोलीस स्टेशन गु.रजि.नं ३७५/२३ भादंवि कलम ३२८, २७२, २७३ सह अन्नसुरक्षा मानके
कायदा,२००६ चे कलम ५९ व इतर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद कारवाईत वर
नमुद तिन्ही दुकानदारांकडुन रू. ०२,५३,२४८/- किंमतीचा गुटखा, पानमसाला इ. प्रतिबंधित माल
जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास कामशेत पो.स्टे चे पोसई शुभम चव्हाण करत आहेत.सदर कारवाई मा.पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधिक्षक  मितेश गट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी, लोनावळा विभाग,  सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोसई शुभम चव्हाण, पो.हवा सागर बनसोडे, पो. हवा बंटी कवडे, पो. ना रईस मुलाणी, पो. शि आशिष झगडे यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!