आरोग्य व शिक्षणमावळ

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “How to study smart” या मार्गदर्शन पर व्याख्यान संपन्न.

प्राध्यापक नितीन फाकटकर यांचे व्याख्यान कांतीलाल शाह विद्यालयाने आयोजित केले होते. 

Spread the love

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “How to study smart” या मार्गदर्शन पर व्याख्यान संपन्न ; प्राध्यापक नितीन फाकटकर यांचे व्याख्यान कांतीलाल शाह विद्यालयाने आयोजित केले होते. 

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १५ डिसेंबर.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित प्राध्यापक नितीन फाकटकर सर यांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “How to study smart” या मार्गदर्शन पर व्याख्यानाचा आत्ता पर्यंत हजार विद्यार्थी व पालकांनी घेतला लाभ
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने #HOW TO STUDY SMART# या विषयावर प्राध्यापक नितीन फाकटकर यांचे व्याख्यान कांतीलाल शाह विद्यालय आयोजित केले होते.

अध्यक्ष उद्धव चितळे, उपाध्यक्ष कमलेश कारले व सचिव श्री शैल मेंन्थे यांच्या पुढाकारातून सादर कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शैलेश शाह उपस्थित होते,या वेळी व्यापीठावर क्लब चे अध्यक्ष उद्धव चितळे, उपाध्यक्ष कमलेश कारले, सचिव श्रीशैल मेंन्थे, खजिनदार प्रमोद दाभाडे, रो मथुरे काका, शुभांगी कारले  उपस्थित होते.

कांतीलाल शाह विद्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाला वोकेश्नल डायरेक्टर फाकटकर सर यांनी या शेवट च्या तीन महिन्यातील अभ्यासाचे साध्या सोप्या भाषेत सत्र आखून दिले. शैलेश शाह यांनी रोटरी क्लब करत असलेल्या या प्रकल्पाचे कौतुक केले. अध्यक्ष उद्धव चितळे यांनी कांतीलाल शाह विद्यालय शालेय समिती व शैलेशभाई शाह यांचे आभार मानले, सदर कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उत्स्पुर्त असा प्रतिसाद दिला व आता पर्यंत १००० विद्यार्थ्यांपर्यंत या व्याख्यानाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!