क्रीडा व मनोरंजनपिंपरी चिंचवड

क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या वतीने गुणवत्ता स्पर्धा 2023 संपन्न.

Spread the love

क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या वतीने गुणवत्ता स्पर्धा 2023 संपन्न.Quality Competition 2023 concluded on behalf of Quality Circle Forum of India, Pune Chapter.

आवाज न्यूज : गुलामअली भालदार चिंचवड प्रतिनिधी,१५ डिसेंबर.

क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या वतीने भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे गुणवत्ता स्पर्धा 2023 आयोजित करून यावर्षीचा गुणवत्ता महिना साजरा करत या उत्सवाचे यंदाचे दहावे वर्ष होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन क्वालिटी-मॅग्ना ऑटोमोटिव्ह कंपनीचे मुख्य विभाग प्रमुख भूषण बडगुजर यांनी केले. यावेळी टाटा कन्सल्टन्सी च्या अश्विनी निमकर आणि क्यूसीएफआय कौन्सिल सदस्या व पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर, परविन तरफदार, धनंजय वाघोलीकर आणि विजया रुमाले उपस्थित होते. समारोपसत्रात प्रमुख पाहुणे साज डायनोचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश जगताप होते. क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया चे अध्यक्ष सतीश काळोखे यांनी प्रमुख पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर पदाधिकारी अनंत क्षीरसागर आणि रुतुजा जगताप यांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रजत, कास्य पदक स्मृतीचिन्ह स्वरूपात प्रदान केले.

या कार्यक्रमात 33 संस्थांमधील 267 स्पर्धकांनी सहभाग घेतला. एकूण 108 जणांना नामांकन प्राप्त झाले. त्यात 47 केस स्टडी, 7 स्किट्स, 31 पोस्टर्स आणि 23 स्लोगन याचा समावेश होता. स्पर्धेत विविध संस्थेतील संघांनी त्यांची गुणवत्ता सुधार यशोगाथा, स्लोगन, पोस्टर आणि स्किट सादर केले.

स्पर्धेत अभिजीत इंडस्ट्रीज-दादरा नगर हवेली, अभिजीत टेक्नो प्लास्ट इंडिया प्रा.लि.-नाशिक, एडविक हाय टेक प्रा.लि.-चाकण, अशोक आयर्न वर्क्स प्रा.लि.-बेळगाव, बेलरिस इंडस्ट्रीज लि.-रांजणगाव, बेलरिस इंडस्ट्रीज लिमिटेड-खांदेवाडी औरंगाबाद, कमिन्स टेक्नॉलॉजीज् इंडिया प्रा.लि.- (पीसीपी-1) फलटण, कमिन्स टेक्नॉलॉजीज् इंडिया प्रा.लि.(पीसीपी-2)-फलटण, फोर्ब्स मार्शल प्रायव्हेट लिमिटेड-चाकण, गॅब्रिएल इंडिया लिमिटेड-देवास मध्य प्रदेश, ग्रुपो अँटोलिन प्रा.लि.-चाकण, आय.ए.सी.इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि.-नाशिक, आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि.- पुणे प्लांट-1, आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि.-पुणे प्लांट-2, जेसीबी इंडिया-फॅब्रिकेशन प्लांट, मॅग्ना ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मिंडा कॉर्पोरेशन लि., वायरिंग हार्नेस विभाग-पुणे युनिट 1-चाकण, मिंडा कॉर्पोरेशन लि. वायरिंग हार्नेस विभाग-मुरबाड, मिंडा कॉर्पोरेशन लि. वायरिंग हार्नेस विभाग-पुणे युनिट-2-(सावदरी स्थान), रत्न उद्योग-कोल्हापूर, स्पार्क मिंडा ग्रीन मोबिलिटी सिस्टम्स् प्रा.लि., टाटा ऑटोकॉम्प गोशन ईव्ही विभाग, टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लि.(आयपीडी), टाटा ऑटो कॉम्प जीवाय बॅटरीस् प्रा.लि., टाटा मोटर्स ईआरसी, टाटा स्टील डाउनस्ट्रीम प्रॉडक्ट्स लि.-रांजणगाव, टेनेको क्लीन एअर इंडिया प्रा.लि., थरमॅक्स बॅबकॉक आणि विलकॉक्स एनर्जी सोल्यूशन्स लि., थिसीन क्रुप लि., टीएम ऑटोमोटिव्ह सीटिंग सिस्टीम प्रा.लि., युएनओ मिंडा लि. (कंट्रोलर डिव्हीजन, पुणे), युनो मिंडा लिमिटेड (रिंडर डिव्हीजन, पुणे) झेडएफ इंडिया प्रा.लि. यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत बोराटे व चंद्रशेखर रुमाले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!