क्रीडा व मनोरंजन

विज्ञान प्रदर्शन, रांगोळी, चित्रकला स्पर्धेचे ला. डॉ. शाळीग्राम भंडारी यांच्या हस्ते उद्घघाटन संपन्न .

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय देहूरोड येथे कार्यक्रम साजरा.

Spread the love

विज्ञान प्रदर्शन, रांगोळी, चित्रकला स्पर्धेचे  ज्येष्ठ ला. डॉ. शाळीग्राम भंडारी यांच्या हस्ते उद्घघाटन संपन्न.Science Exhibition, Rangoli, Painting Competition Famous Speaker Speaker Jyeshtha La. Dr. Inauguration by Shaligram Bhandari.  

आवाज न्यूज : देहूरोड प्रतिनिधी, १५ डिसेंबर.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय देहूरोड येथे बुधवार दिनांक 13 डिसेंबर रोजी- विज्ञान प्रदर्शन, रांगोळी, चित्रकला स्पर्धेचे उद्घघाटन प्रसिद्ध लेखक वक्ते ज्येष्ठ ला. डॉ. शाळीग्राम भंडारी यांच्या हस्ते संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि औपचारिक उद्घाटनानंतर आदरणीय मुख्याध्यापिका रंजना सपकाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्याबरोबरच त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. महा मृत्युंजय मंत्राने-प्रमुख पाहुणे डॉक्टर शाळीग्राम भंडारीनी विद्यार्थ्यांशी संवादाची सुरुवात केली.

डॉक्टर पुढे म्हणाले की- प्रत्येक व्यक्तिमत्व जन्मतःच एखाद्या रिकाम्या ग्लासासारख असतो, जे जे आपण ग्लासात भरत जातो त्या त्या प्रमाणे ग्लासाची किंमत वाढत जाते. अगदी तशीच आणि तशीच परिपक्व व्यक्तिमत्त्वाची निर्मिती होते. पण या निर्मितीसाठी- उत्तम संस्कार समर्पण- सुसंगत साधना या सद्गुणांचा समावेश अत्यंत आवश्यक असतो हे डॉक्टरांनी स्वतःच्या अनुभवातून आणि विविध काव्यपंक्तीतून स्पष्ट केले. याबरोबरच आहार विहार आणि विचार हे शारीरिक आणि मानसिक आरोग्य संपन्नतेसाठी किती महत्त्वपूर्ण आहेत हेही डॉक्टरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले‌. एक पट खाणे दोन पट पाणी पिणे तीन पट चालणे चार पट हसणे आणि पाचपट आनंदी राहणे हा पंचसूत्री कार्यक्रम प्रत्येकाने आत्मसात करणे आवश्यक आहे. कारण हाच निरोगी दीर्घायुष्याचा पाया आहे असं विधान डॉक्टरांनी पुढे आपल्या मनोगतात सांगितले. गझलकार प्रदीप निफाडकरांची अत्यंत संवेदनशील मुलीची कविता सादर करून मद्यपी पित्याची व्यसनमुक्ती करण्यास ती मुलगी कशी यशस्वी झाली हा प्रसंग आपल्या  शब्दातून डॉक्टरांनी व्यक्त केला.

त्यानंतर समारंभाचे विशेष अतिथी राधेश्याम भंडारीनी डॉक्टरांच्या पुस्तकांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना देऊन शाळेला एक संपूर्ण पुस्तकांचा सेट भेट दिला. त्याबरोबरच अतिशय अर्थपूर्ण शेरोशायरी सादर करून राधेश्याम भंडारीनी विद्यार्थ्यांची मने जिंकली.

उगले मॅडम यांनी उत्तम सूत्रसंचालन आणि अतिशय समर्पक शब्दात वक्त्यांची ओळख करून दिल्याने कार्यक्रमाची उंची वाढतच गेली. हा उद्घघाटनाचा अत्यंत देखणा समारंभ यशस्वी होण्यासाठी ज्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते त्यात प्रामुख्याने– आदरणीय रंजना सपकाळे (मुख्याध्यापिका) सविता नाणेकर( उपमुख्याध्यापिका) विभावरी अभंग (पर्यवेक्षिका) सूत्रसंचालन:- उगले मॅडम कार्यक्रमाचे नियोजन:- मिलिंद शेलार सर कलाशिक्षक… सहभागी शिक्षक, गांगुर्डे व्ही.एस. परदेशी वाय.एल. घोडे के.एम. मराडे डी.के.काळे एस. डी.नालंदे सी.एम.प्रमुख! पाहुण्यांची विशेष काळजी कलाशिक्षक  मिलिंद शेलार आणि ज्ञानेश्वर मराठे सरांनी घेतली उप मुख्याध्यापिका सविता नाणेकर यांनी संपूर्ण समारंभाच अभ्यासपूर्ण विवेचन करून उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. सभागृह सोडताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील विलक्षण समाधान आणि आनंद हीच या समारंभाच्या यशस्वीतेची पावती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!