ताज्या घडामोडी

मुरुमच्या महात्मा बसवेश्वर पतसंस्थेस विभागीय स्तरावरील द्वितीय दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित   

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. १९ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, मुंबईच्या वतीने दोन दिवशीय प्रशिक्षण शिबीरात राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा गणपतीपुळे येथे आयोजित ता. १९ (सोमवारी) रोजी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध पतसंस्थेला विभागीय पुरस्कार देण्यात आला. यामध्ये सन २०२१-२२ चा मुरुमच्या श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था चळवळीत दिपस्तंभाप्रमाणे उत्कृष्ट व दिशादर्शक कार्य केल्याबद्ल गट क्रमांक १ मधून १ कोटी ते १० कोटीच्या दरम्यान झालेला पारदर्शक व्यवहार, वाढते भागभांडवल, वसुली व कोरोना काळात सामाजिक बांधीलकीची भावना जोपासून केलेली मदत. त्यांच्या या कार्याबद्ल महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, कार्याध्यक्ष राजूदास जाधव यांच्या हस्ते पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवशरण वरनाळे, उपाध्यक्ष शरणाप्पा मुदकण्णा, संचालक नागेश पाटील, अशोक जाधव, अमृत वरनाळे आदिंचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून मराठवाडा विभागातून द्वितीय दिपस्तंभ पुरस्कार देवून मान्यवरांनी सन्मानित केले. सदर पतसंस्थेने या अगोदर तीन वेळा पुरस्काराने सन्मानित करण्यात येवून हा चौथा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या त्यांच्या यशाबद्ल संस्थेचे सर्व संचालक, सभासद, कर्मचारी वृंद आदिंनी फटाके वाजवून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करून त्यांचे विशेष अभिनंदन केले. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा, महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशनकडून विभागीय द्वितीय पुरस्कार ओमप्रकाश कोयटे, राजूदास जाधव यांच्या हस्ते संस्थेचे शिवशरण वरनाळे, शरणाप्पा मुदकण्णा, नागेश पाटील, अशोक जाधव, अमृत वरनाळे आदी स्वीकारताना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!