क्रीडा व मनोरंजन

मुकुल जयस्वालचे विकेट्सचे पंचक डीएससीए चषक क्रिकेट स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे : मुकुल जयस्वालची भेदक गोलंदाजी आणि सुयश पाटील, निलेश तिकोळेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर स्पीड क्रिकेट क्लबने रॉयल वॉरियर संघाचा तब्बल १२६ धावांनी पराभव करत ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी आयोजित डीएससीए चषक मर्यादित षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत आपल्या खात्यात आणखी एका विजयाची नोंद केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्पीड क्रिकेट क्लबने ३८षटकात ९ बाद २४३ धावसंख्या उभारली. सुयश पाटीलने ५९, निलेश तिकोळेने ५७ धावांची खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. आदित्य गंगारेने ३९ धावा केल्या. दिनेश मोरेने तिन, जयेश मोरेने दोन आणि निनाद साखळकरने एक विकेट मिळवली. उत्तरादाखल मुकुल जयस्वालच्या प्रभावी माऱ्यासमोर रॉयल वॉरीयरचा डाव २३ षटकात ११७ धावांवर आटोपला. प्रणित कुमार १४, यतीन साळवीच्या १३ धावांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मुकुल समोर तग धरता आला नाही. मुकुलने ६ षटकात एका निर्धाव षटकासह २३ धावांत ५ फलंदाज बाद केले. या कामगिरीबद्दल मुकुलला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वप्नील म्हात्रेने १७ धावांत २ विकेट्स मिळवल्या.

संक्षिप्त धावफलक : स्पीड क्रिकेट क्लब : ३८ षटकात ९ बाद २४३ ( सुयश पाटील ५९, निलेश तिकोळे ५७, आदित्य गंगारे ३८, दिनेश मोरे ७-०-२८-३, जयेश मोरे ८-१-२०-२, निनाद साखळकर ५-०-२३-१) विजयी विरुद्ध रॉयल वॉरीयर क्रिकेट क्लब : २३ षटकात सर्वबाद ११७ ( प्रणितकुमार १४, यतीन साळवी १३, मुकुल जयस्वाल ६-१-२३-५, स्वप्नील म्हात्रे ४-१-१७-२) सामनावीर – मुकुल जयस्वाल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!