कै.रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालयात कर्मवीर जयंती उत्साहात साजरी
कै.रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालय, शिगाव मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिमखाना विभाग प्रमुख श्री. अतुल पाटील सर होते.
सुरुवातीला कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे व शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एस.एस.येडके सर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक श्री.एस.के.माने सर यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मीरा शिंदे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अतुल पाटील सर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याचा परिचय तसेच त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्या विषयी माहिती दिली.या कार्यक्रमाला मार्गदर्शन वाळवा शिक्षण संस्थेचे मानद सचिव ऍड.श्री.बी.एस.पाटील (अण्णा) व सहसचिव श्री.धैर्यशील पाटील (बाबा) यांनी केले.
कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सौ.कुंभार मॅडम,सौ.चव्हाण मॅडम ,पवार मॅडम ,करांडे सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी गुरव व दळवी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार श्री.एस.एस.जाधव सरांनी मांडले.