ताज्या घडामोडी
श्री गणेश आखाड्याच्या मल्लांची चमक
क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर
मुंबई : नुकत्याच झालेल्या मुंबई विद्यापीठ ठाणे विभागीय आयोजित झोन ३ आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत श्री गणेश आखाड्याच्या मल्लांनी चांगली कामगिरी केली. पुरुष विभागात त्यांच्या प्रिन्स यादवने ६१ आणि सुयश जांभळेने ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. ९२ किलो गटात त्यांच्या सुर्यकांत देसाईचा दुसरा क्रमांक लागला तर ५७ किलोमध्ये रोशन मांजरे आणि ७९ किलो गटात प्रतिक टिंबेचा तिसरा क्रमांक लागला. कुमारी विभागात ५३ किलोगटात कोमल देसाईने अव्वल क्रमांक पटकावला. तिची मुंबई आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजेत्या पेहेलवानांना वसंतराव पाटील आणि वैभव माने यांचे मार्गदर्शन मिळाले.