ताज्या घडामोडी

सातारा जिल्हा ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे नाईक-निंबाळकर तर उपाध्यक्षपदी कृष्णात उर्फ दादासाहेब चोरमले यांची निवड

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

फलटण, दि. २५ : सातारा जिल्हा ॲम्युचर खोखो असोसिएशनची सन २०२२ ते २०२७ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे.
यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. यासोबतच खो – खोचे राष्ट्रीय खेळाडू दादासाहेब चोरमले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.

फलटण येथील मुधोजी हायस्कूल येथे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सदरील निवडी या बिनविरोध करण्यात आल्या.

सन – १९८३ साली भंडारा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधीत्व करीत असताना महाराष्ट्रा राज्याच्या कुमार संघामध्ये निवड झाली होती. तसेच १९८४ साली फलटण येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य खो- खो असोसिएशन घेतलेल्या राज्य अजिंक्य पद स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यच्या संघातून खेळत असताना त्यांची पुन्हा महाराष्ट्राच्या कुमार संघात निवड झाली होती. तसेच 1992 साली बेंगलोर येथे झालेल्या सिनियर राष्ट्रीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेमध्ये दादासाहेब चोरमले यांना सुवर्णपदक प्राप्त आहे. यासोबतच सातारा जिल्ह्यामधील पुरुष खो – खो खेळाडूंमध्ये सीनियर राष्ट्रीय स्पर्धा खेळलेले ते एकमेव खेळाडू म्हणून दादासाहेब चोरमले यांच्याकडे पाहिले जाते. दादासाहेब चोरमले यांच्या निवडीमुळे खो – खो असोसिएशनला नक्कीच फायदा होईल, असे ही मत खो – खोचे खेळाडू व्यक्त करीत आहेत.

सदरील झालेल्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व सातारा जिल्हा खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शैक्षणिक सामाजिक व सर्वच क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

दादासाहेब चोरमले हे फलटण येथील जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच दादासाहेब चोरमले हे सामाजिक, राजकीय, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रासह इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा सातत्याने कार्यरत असतात त्यांच्या या निवडीबद्दल फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामधून त्यांच्यावर विविध मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!