ताज्या घडामोडी

बदलापूरच्या रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने रेल्वे प्लॅटफॉर्म,स्कायवाॅक,रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छता अभियान संपन्न

Spread the love

(गुरुनाथ तिरपणकर)-आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता ही महत्त्वाची असते,मग ती स्वच्छता घर,रस्ते,स्टेशन परिसर असो,त्याच अनुषंगाने बदलापूरच्या रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने अध्यक्ष राजेंद्र नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.२५सप्टेंबर २०२२रोजी सकाळी ९वाजता बदलापूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म,स्कायवाॅक व स्टेशन परिसर स्वच्छता अभिमान उपक्रम राबविण्यात आला.संटनेच्या क्रीयाशील कार्यकर्तांनी रेल्वे स्टेशनवरील व आजुबाजुच्या परिसरातील पालापाचोळा,कचरा,प्लास्टीक,अनावश्यक वस्तू गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.स्कायवाॅकवर काही व्यक्तींतीनी दुर्गंधी केली होती,तो स्कायवाॅक साफसफाई करुन स्वच्छ करण्यात आला. साफसफाईसाठी आवश्यक साहित्यासाठी समाजसेवक कॅप्टन आशिष दामले यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी स्टेशन मास्तर यांना निवेदनही देण्यात आले.अशा उपक्रमासाठी स्थानिक रेल्वे प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांनीही सहकार्य करावे,असे सुचित करण्यात आले.तसेच या स्वच्छता अभिमानात नगरपालिका आरोग्य अधिकारी श्री.जाधव,स्टेशन मास्तर सिंग,मनोजकुमार यांचे सहकार्य लाभले.या स्वच्छता मोहीमेत राजेंद्र नरसाळे,सौ.शिल्पा बुतकर,सचिन फळणे,निलेश वायकोळी,हर्षद चंबावणे,जतीन शहा,अजित सिंह,धर्मेंद्र गुड,सचिन जाधव,सचिन दरेकर,उमेश पाटील,ऋषीकेश दरेकर व अन्य रेल्वे प्रवासी यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी कार्यकर्यांना संघटनेच्यावतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेवटी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र नरसाळे यांनी सर्वांचे आभार मानले.व अल्पोपहाराने स्वच्छता अभिमान उपक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!