क्रीडा व मनोरंजन

शिवनेरी मंडळाच्या कबड्डी स्पर्धेस प्रारंभ.

Spread the love

मुंबई :- भारत पेट्रोलियम विरुद्ध मध्य रेल्वे डिव्ही. या विशेष व्यावसायिक गटातील साखळी आणि रिझर्व्ह बँक विरुद्ध सचिवालय जिमखाना या प्रथम श्रेणी व्यावसायिक गटातील रंगतदार सामन्याने शिवनेरी सेवा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होईल. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे ही स्पर्धा खंडित झाली होती. पण मंडळाने आपल्या कबड्डीवरील प्रेमा खातर या दोन वर्षात नामांकित खेळाडू व कार्यकर्ते यांच्या मुलाखती “ऑन-लाईन” आयोजित करून आपली कबड्डीवरील निष्ठा कायम राखली. दादर, शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणार दि. २८सप्टेंबर रोजी सायं. ५-०० वा. आमदार डॉ.श्रीमती मनीषा कायंदे व मुंबई नगरीच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थित पार पडणार आहे.

या स्पर्धेतील विशेष व्यावसायिक गटात १५ नामांकित संघांना प्रवेश देण्यात आला आहे. हे सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविला जातील. या १५ सहभागी संघाची ५ गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रथम श्रेणी व्यावसायिक गटात १६ संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या गटाचे बाद पद्धतीने सामने खेळविले जातील. स्थानिक विशेष व्यावसायिक गट स्पर्धेतील विजेत्या संघाला स्व. मोहन राजाराम नाईक चषक व रोख रु. पंचवीस हजार (₹२५,०००/-) प्रदान करण्यात येईल. तर उपविजेत्या संघाला चषक व रोख रु. पंधरा हजार बक्षिसा दाखल देण्यात येतील. उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु.दहा हजार (₹१०,०००/-) देण्यात येतील.

प्रथम श्रेणी स्थानिक व्यावसायिक गटातील अंतिम विजयी संघाला स्व. मुकुंद अण्णा जाधव चषक व रोख रु.पंधरा हजार (₹१५,०००/-) प्रदान करण्यात येतील. उपविजेत्या संघाला चषक व रोख रु.दहा हजार (₹१०,०००/-) देण्यात येतील. उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु.पाच हजार(₹५,०००/-) प्रदान करण्यात येतील. दोन्ही गटात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस प्रत्येकी रोख रु. पाच हजार(₹५,०००/-) देण्यात येतील. तर स्पर्धेतील चढाई व पकडीतील उत्कृष्ट खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. दोन हजार पाचशे (₹२,५००/-) प्रदान करण्यात येतील. अशी माहिती एका पत्रकाव्दारे मंडळाचे सचिव प्रकाश भोसले यांनी प्रसार माध्यमाना कळविली आहे. विशेष व्यावसायिक गटाची गटवारी खालील प्रमाणे.

विशेष व्यावसायिक गट गटवारी :- अ गट :- १)भारत पेट्रोलियम, २)मध्य रेल्वे विभाग, ३)सेंट्रल बँक. ब गट :- १)महिंद्रा, २)युनियन बँक, ३)टी. वी. एम्. क गट :- १)एअर इंडिया, २)मुंबई बंदर, ३)न्यू इंडिया इन्सु.. ड गट :- १)मध्य रेल्वे, २)जे.जे. रुग्णालय, ३)मुंबई महानगर पालिका. इ गट :- १)बँक ऑफ इंडिया, २)मुंबई पोलीस, ३)माझगाव डॉक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!