ताज्या घडामोडी

भक्तांच्या मनात रुजलेली चहार्डी येथील लोटाई माता मंदीर ट्रस्टच्या अध्यक्ष पदी पांडूरंग सोनवणे यांची बिनविरोध निवड

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

चहार्डी  शिवारातील लोटाई माता मंदीर सेवा ट्रस्ट अमळनेर या विश्वस्त मंडळाची जनरल मिंटींग दिनांक 26.9.2022 रोजी संपन्न झाली, या सभेत पुढील 5 वर्षा करीता नवीन विश्वस्त मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली, विश्वस्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांची सर्वानुमते मंडळाचे अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात आली आहे. कार्यकारीनी पुढील प्रमाणे. 1……पांडुरंग सोनवणे. अध्यक्ष(फेर निवड ) 2….धनराज सोनवणे उपाध्यक्ष (रा. नाशिक ) ‌ 3. रमेश सोनवणे. सचीव (रा
पारोळा ) 4..दिलीप सोनवणे खजीनदार‌ (रा. जळगांव ) 5….देवीदास सोनवणे विश्वस्त (रा. चोपडा ) 6 .छगन सोनवणे. विश्वस्त (रा. सुरत )7.सुभाष सोनवणे विश्वस्त (रा. बडोदा ) 8 प्रमोद सोनवणे विश्वस्त (रा. कल्याण ) 9. नारायण सोनवणे विश्वस्त (रा. जळगांव ) शामसुंदर सोनवणे विश्वस्त (रा. हातेड ) भारती सोनवणे विश्वस्त (रा.अमळनेर) रविंद्र शामराव पाटील कायम निमंत्रीत सदस्य (जागा दान देणार रा.चहार्डी ). वरील प्रमाणे कार्यकारीनीची निवड झाली होती, 5 वर्षा पूर्वी सदर शेतात वडाचे झाडांच्या बुंध्याशी लोटाई मातेचे प्रतीक म्हणून गोटे होते‌ त्यांची पुजापाठ कुलाचार, रामनमीचे दिवशी मुलांचे जाऊळ काढणे, नवस फेडणे पिढ्यान पिढ्या सूरू होते, त्यासाठी सोनवणे परिवारातील लोक महाराष्ट्र, गुजराथ , मध्यप्रदेश,येथून हजारोच्या संख्येने रामनवमी व नवरात्रीत येत असतात, माता जंगला असल्याने पाणी‌ ,सावली, राहण्याची कोणतीच व्यवस्था नव्हती. ,,, सेवानिवृत्ती नंतर आम्ही महाराष्ट्र , गुजरात, मध्य प्रदेशात फिरून भेटी दिल्या, मिटींग घेतल्या रीतसर ट्रस्ट नोंदणी करून सन 1997 मध्ये ट्रस्टची स्थापना केली, त्यानंतर आतापर्यंत 25बाय 20 जागेवर मंदीर बांधले, 4 फुट उंचीची मुर्ती स्थापीत केली, 25 बाय 45 जागेवर सभामंडप बांधला, भाविकांसाठी, 15बाय 20 जागेवर भक्तनिवास बांधला, जवळपास 44 लाखांची कामे चार वर्षात केली, होणारे कामे पाहून सोनवणे परिवारातील लोकांनी विश्वस ठेवून देणगी दिली व देत आहेत ,
जमीन मालकानेही माझे विनंती प्रमाणे 10,000(दहा हजार ) चौरस फुट जागा विनामोबदला दान दिली आहे, सर्व बांधकांमाचे पुर्ण वेळ देऊन,प्रत्यक्ष थांबून माझे देखरेखीत सदर कामे केली आहेत, पाच वर्षात आलेली रकम ट्रस्ट कामासाठीच वापरली सर्व आर्थीक व्यवहारही माझेकडे दिला होता , पाच वर्षात विश्वस्त मंडळास चहापाणी, मिटींग खर्च, प्रवास‌ खर्च इत्यादी खर्च मीही केला नाही व करून दिला नाही, आमचे लोटाई माता मंदीर चोपडा तालुक्यातील चहार्डी शिवारात रविंद्र शामराव पाटील यांचे शेतात आहे, चहार्डी पासून 3 कि.मी.हातेड पासून 3.कि.मी. असे लहान हातेड ते चहार्डी या रस्तावर मध्यवर्ती भागी आहे, अमळनेर पासून मंदीर 35 की मी वर आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री पांडूरंग सोनवणे यांच्या कार्यास महसुल खात्यातील मित्र परिवार यांचे कडुन शतशः नमन ॥जय लोटाई माता॥

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!