ताज्या घडामोडी

रूपालीताई चाकणकर यांचे हस्ते ‘ सॅनिटरी नॅपकीन बॅंक ‘ उपक्रमाचा शुभारंभ

Spread the love

खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचे माध्यमातून सॅनिटरी नॅपकीन बॅंक उपक्रमांची सुरूवात करण्यात आली.मुलींनी नैसर्गिक मासिक पाळीचा न्यूनगंड मनात न बाळगता घरात आई,बहीण,मैत्रिणी शी चर्चा करावी.स्त्रीला दिलेली ती नैसर्गिक देणगी आहे.यावेळी त्र्यंबक अण्णा मोकाशी,सरपंच शिल्पा गायकवाड,भावना पाटील,शुभांगी खिरीड,वंदना शेडे,सुरेखा भामे,सुरेखा चव्हाण,नंदा जावळकर,शितल जावळकर तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक शशिकांत जाधव यांनी केले.प्रमुख पाहुणे रूपालीताई चाकणकर,मुख्याध्यापक म्हाळसाकांत खेडेकर,त्र्यंबक अण्णा मोकाशी,लक्ष्मण माताळे सरपंच शिल्पा गायकवाड,यांनी मनोगत व्यक्त केले.डाॅ.स्वागत रिंढे यांनी मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन व पूर्वतयारी जेष्ठ शिक्षक शशिकांत जाधव यांनी केले.आभार ज्योत्स्ना गुरव यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण माताळे,वंदना शेंडे,शुभांगी खिरीड,सारिका पानसरे,अपर्णा वाघमारे,कीर्ती जाधव,अंकिता कुंभार,विजय सुरवसे यांनी सहकार्य केले.यावेळी विद्यार्थ्यींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!