ताज्या घडामोडी

कांदिवली मध्ये भाजपा व सह्याद्री प्रगती मंडळ व्दारा भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

Spread the love

भारत कवितके मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसा निमित्त पंधरावडा उपक्रमा अंतर्गत कांदिवली पश्चिम मधील भाजपा खासदार गोपाळ शेट्टी व चारकोप विधानसभा आमदार योगेश सागर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक २ आक्टोंबर २०२२ रोजी सकाळी १०ते दुपारी २ वाजेपर्यंत गणेश मंदिर,सह्याद्री नगर या ठिकाणी भाजपा वार्ड क्रमांक २० चे नगरसेवक व चारकोप विधानसभा अध्यक्ष बाळा तावडे यांनी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ‍महात्मा गांधी ब्लड बँकचे डाक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,व कामगार या स्टाफ मार्फत या उपक्रमा अंतर्गत रक्त संकलन करण्याचे काम करण्यात आले. रक्तदान शिबीराच्या सुरुवाती ला भाजपा उतर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते महात्मा गांधी जयंती निमित्त साधून म.गांधीजी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलीत केला.व रक्तदान शिबीराचे उद्घाटन केले.भाजपा कार्यकर्ते संतोष जाधव,महेन्द्र यादव,मुकेश चौधरी,विवेक हडकर, आदि रक्तदात्यांचा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला केला. या प्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी, नगरसेविका प्रियंका मोरे,नगरसेवक बाळा तावडे, पत्रकार व साहित्यिक भारत कवितके, महामंत्री योगेश पडवळ ,आर.एस.वर्मा,महिला मोर्चा अध्यक्षा रेशमा टक्के,व्योमा भट,सिमा राणे,दिनेश जयस्वाल,अफजल खान,व सह्याद्रि नगर प्रगती मंडळाचे पदाधिकारी, रहिवाशी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!