ताज्या घडामोडी

शिराळ्यात शिराळा मॅरेथॉन 2022 स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शिराळा येथे आज वीरा प्रतिष्ठान मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिराळा मॅरेथॉन-2022 स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा घेण्यात आली. प्रचंड उत्साहात पार पडलेल्या स्पर्धेत दोन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सकाळी ६ वाजता जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते उद्घाटन होऊन स्पर्धेस सुरवात झाली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक उपस्थित होते. विजेत्यांना बक्षीस वितरण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
१० किलोमीटर गटातील १ ते १० क्रमांकाचे पुरुष व महिला विजेते असे : पहिला क्रमांक : प्रविण कांबळे (सांगली) व सानिका रुपनर (नागज), दुसरा क्रमांक : पाडुरंग चौगुले (इरळी) व कोमल निकम (सांगली), तिसरा क्रमांक : चैतन्य रूपनर व करीना साबळे (दोघे नागज),चौथा क्रमांक : समाधान तांबे (जत) व शुभांगी वाघमोडे (सांगली), पाचवा क्रमांक : सुमंत राजभर (सांगली) व माधुरी बाबर (सांगोला), सहावा क्रमांक : सुहास पाटील (नाटोली, शिराळा) व शितल मोहिते (कडेगांव), सातवा क्रमांक : नवलू गावडे (खुंदलापूर, शिराळा) व समृद्धी पवार (कुरळप, वाळवा), आठवा क्रमांक : अशिष गाडे (तासागाव) व मेघा पाटील (कुरळप, वाळवा), नववा क्रमांक : सागर रसाळ (चिकूर्डे, वाळवा) व सुजाता खोत (शेडगेवाडी, शिराळा), दहावा क्रमांक : ऋषिकेश जाधव व अर्पिता डवरी (दोघे सांगली).
५ किलोमीटर गटातील १ ते १० क्रमांकाचे पुरुष व महिला विजेते असे : पहिला क्रमांक : धुळदेव घागरे व तृप्ती किरवे (दोघे सांगली), दुसरा क्रमांक : अजित लवटे (नागज) व ज्योती कोळेकर (दुधगाव), तिसरा क्रमांक : मिथुन माने (इरळी) व रोहिणी खिलारे (सांगली), चौथा क्रमांक : ऋषिकेश सुर्यवंशी (कुची) व वैष्णवी भोईटे (सांगली), पाचवा क्रमांक : अभिजीत माने (तासगाव) व मानसी हराळे (सांगली), सहावा क्रमांक : विकास बावडे (मांगले, शिराळा) व हर्षल पाटील (सांगली), सातवा क्रमांक : अभिजीत खोत (दूरंदेवादी, शिराळा) व सिद्धी मानकर (मानकरवाडी, शिराळा), आठवा क्रमांक : प्रथमेश उगळे (चिखली, शिराळा) व शिवानी शेवाळे (शेडगेवाडी, शिराळा), नववा क्रमांक : केरू चिरमुले (आष्टा, वाळवा) व प्रथमा पाटील (खिरवडे, शिराळा), दहावा क्रमांक : रोहन यादव (येळापुर, शिराळा) व हर्षदा गायकवाड (इंग्रुळ, शिराळा). स्पर्धेस विश्वास व विराज उद्योग समूह, मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान, नगरपंचायत व शिराळा पोलिसांनी सहकार्य केले. एज लीड टीव्ही, रत्नदीप मोटर्स व डॉ. यादव अर्थोपेडिक हॉस्पिटल यांचे सहकार्य व अनेक मान्यवरांचे लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!