महंत स्वामी काशीकानंद महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष दादा काळे यांची आश्रमास भेट
शिर्डी प्रतिनिधी :
महंत स्वामी काशीकानंद महाराजयांच्या वाढदिवसानिमित्त साईबाबा संस्थानचे अध्यक्ष नामदार आशुतोष दादा काळे यांची साईबाबा वारकरी शिक्षण संस्था शिर्डी आश्रमला भेट दिली. त्यावेळी त्यांचे स्वागत महंत स्वामी काशीकानंद महाराज यांनी केले. यावेळी आश्रमा बाबत व आश्रमाच्या कार्याबाबत पंढरपूर आळंदी त्र्यंबकेश्वर पैठण येथे पालखी दरवर्षी नेली जाते. याबाबत माहिती शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी दिली. यावेळी संस्थांचे अध्यक्ष नामदार अशितोष दादा काळे व साईबाबा संस्थानचे विश्वस्त महेंद्र दादा शेळके, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापु कोते, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, दादासाहेब गोंदकर, दत्तात्रेय कोते, साई संस्थान पतपेढीचे सचिव नवाजी डांगे पाटील यांचा सत्कार महंत स्वामी काशीकानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. आशुतोष दादा काळे म्हणाले की आश्रमासाठी योग्य ती मदत केली जाईल यावेळी भाऊसाहेब थेटे ठकाजी काटकर उत्तमराव मते रमेश महाराज लहू महाराज व आश्रमातील विद्यार्थी उपस्थित होते.