महाराष्ट्र

रांगोळीतून साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे पंधरा हजार स्क्वेअर फुटाचे चित्र 

Spread the love

बीड : येथे छत्रपती शिवरायांचे पंधरा हजार चौरस फूट जागेत 17 ब्रास बेसॉल्ट दगड व रंग वापरून आकर्षक रेखाचित्र साकारण्यात आले आहे.

महाआरती, अभिवादन आणि रांगोळी चित्राचे भव्य अनावरण छत्रपती शिवाजी छत्रपती महाराज नगरी येथे होणार असून या प्रसंगी शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे अशी माहिती शिवजन्मोत्सव कार्यकारणीच्या सदस्यांनी गेवराई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बीड जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून मागील अनेक वर्षापासून नेत्रदीपक आणि शिस्तबद्ध शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

आजवर शिवगर्जना, राजा शिवछत्रपती, शंभूराजे या महानाट्याचे तसेच आकर्षक व नेत्रदीपक देखावे, महाआरोग्य शिबिर, मॅरेथॉन ,वकृत्व, रांगोळी व चित्रकला यासारख्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन शिवजन्म उत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले.मागील दोन वर्ष कोरोना सारख्या संकटामुळे यामध्ये खंड पडला होता. परंतु या वर्षी पुन्हा नव्या जोमाने कोरोना विषयक नियमांचे पालन करत आकर्षक व अनोखा शिवजन्मोत्सव सोहळा गेवराई शहरात आयोजित करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत विजयसिंह पंडित यांनी सांगितले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!